मुंबई, 20 जुलै : सरकारी बँकांमध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात नाबार्डमध्ये (NABARD) नोकरीची संधी आली आहे. नाबार्डमध्ये 170 जागांसाठी भरती होणार (Vacancy In NABARD) आहे. याबद्दलचं निवेदन जारी करण्यात आलं आहे. या निवेदनाच्या माध्यमातून या 170 जागांवरची भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी नाबार्ड बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे nabard.org वर जाऊन अर्ज (Application) करावा. टीव्ही 9 भारतवर्षच्या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे. नाबार्डमधील ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन (Online Application Process) होणार आहे. मात्र अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या अधिकृत वेबसाईटवर जाऊन देण्यात आलेले नोटिफिकेशन व्यवस्थित तपासून करून मगच अर्ज करावा. “शिक्षण नाही तर काहीच नाही” असे विचार आता सोडा; 12वी पास नसाल तरीही ‘हे’ जॉब्स मिळतीलच असिस्टंट मॅनेजर पदासाठी (Assistant Manager) हे अर्ज मागवले जात आहेत. 18 जुलै 2022 पासून ही प्रक्रिया सुरु झाली आहे. 7 ऑगस्ट 2022 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांसाठी प्रवेश फी (Application Fees) भरण्याची अंतिम तारीखही 7 ऑगस्ट 2022 हीच आहे. तर या पदांसाठी 7 सप्टेंबर 2022 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे, असं या प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. असा करा अर्ज 1. नाबार्ड बँकेमधील या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वांत आधी नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर nabard.org वर जा. 2. वेबसाईटच्या होम पेजवर CAREER NOTICES च्या लिंकवर क्लिक करा. 3. त्यानंतर Recruitment To The Post Of Assistant Manager In Grade ‘A’ (P & SS) या लिंकवर जा. 4. त्यानंतर Apply Here या पर्यायावर क्लिक करा. 5. त्यानंतर तिथे सांगितल्याप्रमाणे सर्व डिटेल्स म्हणजे सविस्तर माहिती भरून नोंदणी प्रक्रिया म्हणजे रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. 6. ऑनलाईन रजिस्ट्रेशननंतर अर्ज (Application Form) भरा. 7. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढायला विसरू नका. आता कोणाचीही बॉसगिरी सहन करू नका; स्वतःच व्हा स्वतःचे Boss; असं करा फ्रिलान्सिंग प्रवेश अर्ज फी (Application Fee) या पदांसाठी प्रवेश अर्ज फी भरल्यानंतर मगच अर्ज पूर्ण भरला असं मानलं जाईल. असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी आणि इडब्ल्यूएस (EWS) या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 800 रुपये फी आहे. तर SC-ST आणि PH प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये फी द्यावी लागेल. पात्रता आणि वयोमर्यादा नाबार्डच्या असिस्टंट मॅनेजर पदासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ (University) किंवा संस्थेची ट्रेडशी संबंधित पदवी असणे गरजेचे आहे. ग्रॅज्युएशनसाठी 60% गुण मिळवणं अनिवार्य आहे. तर उमेदवारांचं वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 1 जुलै 2022 पर्यंत वयाची 30 वर्ष पूर्ण करणाऱ्यांना पात्र समजलं जाईल. आरक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांसाठी भरती नियमांनुसार वयाच्या अटीत सूट दिली जाईल. तेव्हा तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्ही वर सांगितलेल्या सर्व पात्रता निकष पूर्ण करत असाल तर लगेचच नाबार्डच्या वेबसाईटवर जा आणि अर्ज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.