मुंबई, 12 जानेवारी: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees’ State Insurance Corporation Mumbai) इथे लवकरच वैद्यकीय पदांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIC Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती (ESIS Hospital Mumbai Recruitment 2022) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (Government Jobs in Maharashtra) उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 17, 18 आणि 29 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - एकूण जागा 24 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच यासह उमेदवारांनी पीजी, एमडी किंवा DNB मध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. फार्मसी क्षेत्रात आहेत करिअरच्या अनेक संधी; जाणून घ्या कसं घ्यावं शिक्षण इतका मिळणार पगार ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज केल्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 67,700/- रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे. तसंच उमेदवारांना इतर सोयी सुविधाही देण्यात येणार आहेत. वयोमर्यादा ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 45 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, पंचदीप भवन, प्लॉट नं. 9, रुड क्रमांक- 7, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093 देशातील मोठ्या IT कंपन्यांमध्ये Job हवाय? मग ‘या’Programming Languages आताच शिका मुलाखतीची तारीख - 17, 18 आणि 29 जानेवारी 2022
| JOB TITLE | ESIC Mumbai Recruitment 2022 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - एकूण जागा 24 |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS पर्यँतशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच यासह उमेदवारांनी पीजी, एमडी किंवा DNB मध्ये डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून, महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदानुसार किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
| इतका मिळणार पगार | ज्येष्ठ रहिवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज केल्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 67,700/- रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे. तसंच उमेदवारांना इतर सोयी सुविधाही देण्यात येणार आहेत. |
| वयोमर्यादा | उमेदवारांचं वय हे 45 वर्षांपेक्षा अधिक नसावं. |
| मुलाखतीचा पत्ता | कर्मचारी राज्य विमा महामंडळ, उपप्रादेशिक कार्यालय, पंचदीप भवन, प्लॉट नं. 9, रुड क्रमांक- 7, एमआयडीसी मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई – 400093 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahasarkar.co.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

)







