मुंबई, 01 फेब्रुवारी: JEE Mains 2023 परीक्षेच्या जानेवारी सत्रातील परीक्षेचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेल्या 24 जानेवारीपासून पहिल्या सत्रातील परीक्षा सुरु झाल्या आहेत. यंदा JEE mains परीक्षा ही जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. पहिल्या सत्रातील परीक्षांचे निकालही यंदा लवकरच जाहीर होणार आहेत. NTA नं याबद्दल माहिती दिली आहे.
जेईई मेन 2023 ची जानेवारी सत्र परीक्षा आज 1 फेब्रुवारी रोजी संपेल. जेईई मेन 2023 च्या जानेवारी सत्राचा निकाल 7 फेब्रुवारी रोजी जाहीर होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (एनटीए) संचालक विनीत जोशी यांनी ही माहिती दिली आहे. जेईई मेनच्या पहिल्या सत्राचा निकाल 7 फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिद्ध होईल. परीक्षेसोबतच निकाल तयार करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास विलंब होणार नाही. कोरोना महामारीमुळे मागील वर्षी परीक्षा घेण्यात आणि नंतर निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. मात्र यावेळी एनआयटी आणि आयआयटीचे प्रवेश वेळेवरच होणार आहेत.
ना जॉबचं टेन्शन ना बॉसचं प्रेशर; असे घरबसल्या कमवा तासाचे लाखो रुपये
अहवालानुसार जेईई मेनच्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच ते सहा टक्के विद्यार्थी कमी दिसून आले. मात्र, तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. जेईई मेनच्या पहिल्या टप्प्यासाठी 8 लाख 66 हजार मुलांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 50 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नाही.
Career Tips: महिन्याला मिळेल लाखोंमध्ये सॅलरी; 'हा' कोर्स शून्यातून वर घेऊन जाईल तुमचं करिअर
10 फेब्रुवारीपासून जेईई मेन 2023 चा दुसरा टप्पा
जेईई मेन 2023 च्या पहिल्या सत्राचा निकाल लागताच दुसऱ्या सत्राची नोंदणी प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरू होईल. दुसऱ्या सत्राची परीक्षा 6 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्याचा निकाल 20 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. दोन्ही सत्रांसह एकूण 2.5 लाख विद्यार्थ्यांची JEE Advanced साठी निवड केली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam result