जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JEE Mains 2022: काय सांगता? अजूनही पूर्ण अभ्यास झाला नाहीये? टेन्शन नको; एका आठवड्यात असा करा अभ्यास

JEE Mains 2022: काय सांगता? अजूनही पूर्ण अभ्यास झाला नाहीये? टेन्शन नको; एका आठवड्यात असा करा अभ्यास

JEE Mains Exam 2022 study tips

JEE Mains Exam 2022 study tips

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही JEE mains 2022 परीक्षा (JEE Mains Exam 2022 study tips) देणार असल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून: दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE Mains परीक्षा (JEE Mains Exam 2022) देतात. बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी या परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. यासाठी विद्यार्थी मेहनत करत आहेत. मात्र JEE परीक्षेला (JEE mains preparation tips) अवघे काही दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांनी नक्की कसा अभ्यास (How to study for JEE mains) करावा ही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही JEE mains 2022 परीक्षा (JEE Mains Exam 2022 study tips) देणार असल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया. तयारी दरम्यान सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष केंद्रित करणे आणि अभ्यासादरम्यान सकारात्मक दृष्टीकोन राखणे. एकाग्रतेने आपण चांगली तयारी करू शकतो. JEE Mains 2022: परीक्षेला अवघे 8 दिवस शिल्लक; आज प्रवेशपत्र जारी होण्याची शक्यता परीक्षेच्या काळात वेळेच्या व्यवस्थापनाची मोठी भूमिका असते. जास्तीत जास्त सरावानेच वेळेचे व्यवस्थापन शक्य आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या मॉक टेस्ट देणे आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे महत्त्वाचे आहे. JEE मध्ये यश मिळवण्यासाठी सर्व प्रश्न कमी वेळेत सोडवणे आवश्यक आहे. पण वेगाच्या शोधात चुका करू नका. नमुना पेपरचा सराव करा ज्यामुळे प्रश्नांच्या पॅटर्नबद्दल योग्य कल्पना येईल आणि वेळ व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल. विचारलेल्या प्रश्नांची पातळी समजून घेण्यासाठी मागील वर्षीचे जेईई पेपर (JEE Mains last year question papers) सोडवा. अभ्यास करणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच ब्रेक घेणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तयारी करताना कंटाळा येत नाही आणि मूडही फ्रेश राहतो. ताज्या मूडसह तयारी अधिक चांगली होऊ शकते. मेडिटेशन करत राहा. हे करणे तुमच्या मनासाठी चांगले आहे तसेच तयारीला चालना देण्यासाठी देखील कार्य करेल. परीक्षेला जाण्यापूर्वी मेडिटेशन अवश्य करा. आला रे आला निकाल जवळ आला; येत्या आठवड्यात ‘या’ तारखेला 10चा निकाल जास्त ताण घेऊ नका. दररोज रात्री पाच ते सहा तासांची झोप शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक आहे, विशेषतः जेईई मेन २०२२ च्या तीन-चार दिवस आधी. विश्रांतीमुळे ताजेपणा परत येऊ शकतो. पण दिवसभरात जास्त झोपू नका हेही लक्षात ठेवा. दडपण आणि टेन्शन विसरून सर्वतोपरी तयारी करा आणि यश नक्कीच तुमच्या समोर असेल. काही महत्त्वाच्या लिंक्स  JEE Main Mock URL – https://www.topperlearning.com/jee/mock-test-start-21 JEE Main Formulae download – https://www.topperlearning.com/jee/main-formulae JEE Main Prev. year solved papers - https://www.topperlearning.com/jee/main-previous-year-papers

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात