मुंबई, 14, जून: दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी जेईई परीक्षा देतात. जेईई परीक्षा ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. याचे दोन टप्पे आहेत - JEE Mains आणि JEE Advanced. जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण करणारे उमेदवार जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेला बसतात. दरवर्षी एक किंवा दुसर्या आयआयटीकडे जेईई परीक्षेची जबाबदारी सोपवली जाते. या वर्षी आयआयटी गुवाहाटीने जेईई परीक्षा घेतली होती. आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 18 जून 2023 रोजी JEE Advanced 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, IIT मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. पण निकाल लागल्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल याबद्दल आह जाणून घेऊया. NEET UG: प्रचंड मेहनत केली पण NEET क्रॅक झाली नाही? टेन्शन नॉट; तरीही असा मिळेल मेडिकल कोर्सला प्रवेश जेईई अॅडव्हान्सचा निकाल कुठे जाहीर होईल? JEE Advanced Result 2023 प्रकाशित होताच अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर अपलोड केला जाईल. JEE Advanced 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, यशस्वी उमेदवारांची श्रेणीनिहाय ऑल इंडिया रँक (AIR) ऑनलाइन पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल. याशिवाय यशस्वी विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरही गुण पाठवले जातील. 12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link JoSAA समुपदेशन कधी सुरू होईल? अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा 2023 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, संयुक्त जागा वाटप (JoSAA) 2023 ची प्रक्रिया 19 जून 2023 संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरू होईल. IITs द्वारे निर्धारित किमान गुण मिळवणारे यशस्वी उमेदवार JoSAA समुपदेशन आणि IITs (JoSAA समुपदेशन 2023) मध्ये प्रवेशासाठी पात्र असतील. Career in Advertising: नाव, पैसा आणि ग्लॅमर Advertisement क्षेत्रात आहे सर्वच काही; कसं कराल यात करिअर? एक्सपर्ट्स म्हणतात… असा चेक करा तुमचा निकाल JEE Advanced 2023 चा निकाल तपासण्यासाठी, अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर जा. होमपेजवर दिसणार्या JEE Advanced Result 2023 च्या लिंकवर क्लिक करा. तेथे लॉगिन तपशील प्रविष्ट केल्यानंतर सबमिट वर क्लिक करा. JEE Advanced 2023 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल. ते डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट देखील घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.