मुंबई, 08 मे: JEE Mains परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. उत्तीर्ण उमेदवारांना जेईई अॅडव्हान्स्डसाठी अर्ज करावा लागणार आहे. यावर्षी JEE Advanced 2023 ची परीक्षा 04 जून रोजी होणार आहे. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया बंद झाली आहे. परीक्षेसाठी फी भरण्याची शेवटची तारीख आज असणार आहे. JEE Advanced 2023 साठी ऑनलाइन नोंदणी 30 एप्रिल 2023 पासून सुरू आहे. यामध्ये अर्ज करणाऱ्यांना 08 मे पर्यंत शुल्क जमा करता येईल. यावर्षी JEE Advance चा निकाल 18 जून 2023 रोजी लागणार आहे. 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी जॉबचा गोल्डन चान्स; सेंट्रल GST & कस्टम्स झोनमध्ये मोठी भरती; करा अप्लाय असं करा रजिस्टर नोंदणीसाठी, प्रथम तुम्हाला jeeadv.ac.in या वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर महत्त्वाच्या घोषणांच्या लिंकवर क्लिक करा. पुढे JEE (Advanced) 2023 साठी ऑनलाइन नोंदणीसाठी लिंकवर क्लिक करा. तुमचा तपशील भरून नोंदणी करा. नोंदणी फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर, एक प्रिंट काढा. Railway Recruitment: ईस्ट कोस्ट रेल्वेच्या क्रीडा विभागात बंपर ओपनिंग्स; पात्र आहात का? करा अप्लाय किती असेल फी सर्व वर्गातील उमेदवारांनी नोंदणीसाठी शुल्क जमा करणे आवश्यक आहे. यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी 2900 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दुसरीकडे, एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 1450 रुपये आहे. हीच फी महिलांसाठी आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येते.
परीक्षेची वेळ IIT गुवाहाटीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, JEE Advanced परीक्षा संगणक आधारित चाचणी म्हणजेच CBT मोडमध्ये घेतली जाते. त्याच वेळी, उमेदवार सलग दोन वर्षांत जास्तीत जास्त दोनदा परीक्षा देऊ शकतो. लक्षात ठेवा JEE Advanced परीक्षा 4 जून 2023 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिल्या शिफ्टची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होईल. तर दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी 2.30 ते 5:30 या वेळेत घेतली जाईल. यंदा त्यात अडीच लाखांहून अधिक उमेदवार बसू शकतात.