जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: या शासकीय संशोधन संस्थेत नोकरीची संधी; Diploma इंजिनिअर्ससाठी ओपनिंग्स; करा अप्लाय

JOB ALERT: या शासकीय संशोधन संस्थेत नोकरीची संधी; Diploma इंजिनिअर्ससाठी ओपनिंग्स; करा अप्लाय

ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू

या पदासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची प्रक्रिया आदी बाबींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 जून: सरकारी नोकरी हे बहुतांश सुशिक्षित तरुणांचं स्वप्न असतं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हे तरुण सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. सध्या नोकरीच्या संधी मर्यादित आणि इच्छुकांची संख्या जास्त अशी विषम परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळवण्यात यश मिळतंच असं नाही. मात्र हे माहिती असूनही तरुण जिद्दीने प्रयत्न सुरु ठेवतात. जर तुम्ही इंजिनीअरिंग केलं असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडियन स्टॅस्टिकल इन्स्टिट्युट अर्थात आयएसआयममध्ये ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या एका रिक्तपदाच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची प्रक्रिया आदी बाबींविषयी सविस्तर जाणून घेऊया.`फ्रेशर्स लाइव्ह डॉट कॉम`ने या बाबतची माहिती दिली आहे. Railway Jobs: रेल्वेत नोकरी हवीये ना? मग असा अभ्यास कराल तर एका झटक्यात मिळेल सरकारी नोकरी इंडियन स्टॅस्टिकल इन्स्टिट्युट अर्थात भारतीय सांख्यिकी संस्थेत (आयएसआय) ज्युनिअर इंजिनीअर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात आयएसआयने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या प्रक्रियेतून ज्युनिअर इंजिनीअरचे एक रिक्त पद भरले जाणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात. Mumbai Metro Recruitment: तब्बल 2,80,000 रुपये पगार; इंजिनिअर्ससाठी मुंबई मेट्रोमध्ये जॉब्सची मोठी घोषणा; करा अप्लाय अधिकृत अधिसूचनेनुसार, ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी इच्छुक उमेदवार पदविकाधारक (डिप्लोमा) असावा. इयत्ता 12 वी उत्तीर्ण उमेदवारदेखील या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठीची अर्ज प्रक्रिया 19 जून 2023 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्यासाठी 10 जुलै 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनीअर या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराचं पोस्टिंग आयएसआय कोलकाता येथे होईल. SBI Clerk Salary: स्टेट बँकेत क्लर्कला किती पगार मिळतो माहितीये? कसं होता येतं मॅनेजर? इथे मिळेल संपूर्ण माहिती अधिसूचनेनुसार, संस्था प्रत्यक्ष मुलाखत अर्थात वॉक-इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ज्युनिअर इंजिनीअर पदासाठी पात्र उमेदवाराची निवड करणार आहे. या साठी प्रत्यक्ष मुलाखती 10 जुलै 2023 रोजी पार पडतील. प्रत्यक्ष मुलाखती संदर्भातील प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिसूचना वाचावी. ज्युनिअर इंजिनीअर या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला दरमहा 45,000 रुपये वेतन देण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी, ऑनलाइन अर्जासाठी तसेच अन्य ऑनलाइन प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांनी isichennai.res.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती अधिसूचनेत नमूद आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात