मुंबई, 20 एप्रिल: आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करणारी कंपनी, अशी भारतातील दुसरी सर्वांत मोठी आयटी कंपनी (IT Company) असलेल्या इन्फोसिसची (Infosys) ख्याती आहे. मात्र, आता कंपनीनं कर्मचाऱ्यांसमोर काही जाचक अटी ठेवल्या आहेत. कंपनीनं राजीनामा दिलेल्या आणि भविष्यात देणाऱ्या सर्व कर्मचार्यांसाठी (Ex-Employees) एक नवीन नियम लागू केला आहे. जर इन्फोसिसच्या स्पर्धक (Competitors) कंपनीचे आणि इन्फोसिसचे क्लायंट सारखेच असतील तर त्या ठिकाणी इन्फोसिसचे माजी कर्मचारी काम करू शकत नाही, असा हा नियम आहे. हा नियम इन्फोसिस सोडल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत लागू असेल, असंही सांगण्यात आलं आहे. यामुळे कंपनीतून राजीनामा दिलेल्या किंवा देण्याच्या तयारी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत इन्फोसिसमधील 80 हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ही कर्मचाऱ्यांची गळती रोखण्यासाठी कंपनीने ही जाचक अट लादायला सुरुवात केली आहे. तर, इन्फोसिसच्या या जाचक अटींविरोधात नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट अर्थात एनआयटीईएस (NITES) या प्रख्यात आयटी कर्मचारी संघटनेनं (IT Employees Union) तक्रार दाखल केली आहे. ट्रॅक डॉट इननं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सध्या इन्फोसिसमध्ये रिक्रुटमेंट ड्राईव्ह सुरू आहे. सालाबादप्रमाणं या वर्षीही इन्फोसिसनं फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. नव्यानं रूजू होणाऱ्या कर्मचार्यांना दिलेल्या ऑफर लेटरमध्ये (Offer Letter) कंपनीनं एक नवीन आणि अतिशय जाचक क्लॉज (Clause) अॅड केला आहे. ‘सर्व गोष्टी विचारात घेऊन, कोणत्याही कारणास्तव इन्फोसिसमधील माझी नोकरी संपुष्टात आल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी, मी खालील नियमांचं उल्लंघन करणार नाही: गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिकेत 75,000 रुपये पगाराची नोकरी; इथे करा अर्ज
इन्फोसिस कंपनीतून काढून टाकण्यापूर्वीचे 12 महिने मी इन्फोसिसचा एम्प्लॉयी म्हणून ज्या कस्टमर कंपनीसोबत काम करत होतो अशा कोणत्याही कस्टमर कंपनीची नोकरीची ऑफर स्वीकारणार नाही.
इन्फोसिस कंपनीतून काढून टाकण्यापूर्वीचे 12 महिने मी इन्फोसिसची एम्प्लॉयी म्हणून ज्या कस्टमर कंपनीसोबत काम करत होतो तिच कंपनी जर मला नंतर नोकरी देऊ इच्छित असलेल्या इन्फोसिसच्या स्पर्धक कंपनीची कस्टमर असेल आणि त्या कंपनीसोबतच मला काम करावं लागणार असेल तर मी या स्पर्धक कंपनीने दिलेली ऑफर स्वीकारणार नाही. इन्फोसिसनं आपल्या नवीन ऑफर लेटरमध्ये, टीसीएस(TCS), आयबीएम(IBM), कॉग्निझंट(Cognizant), विप्रो(Wipro) आणि अॅक्सेंच्युअर(Accenture) या पाच प्रमुख आयटी कंपन्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख केला आहे. वरील कंपन्यांचे आणि इन्फोसिसचे क्लायंट सारखेच असतील तर राजीनामा दिलेल्या कोणत्याही इन्फोसिस कर्मचाऱ्याला पुढील सहा महिन्यांसाठी तिथे काम करता येणार नाही. पण, जर इन्फोसिसमधील कर्मचार्यानं गेल्या 12 महिन्यांच्या काळात त्या क्लायंटसोबत काम केलेलं असेल तरच ही अट लागू होऊ शकते. इन्फोसिस कर्मचार्यांकडून तक्रारी मिळाल्यानंतर एनआयटीईएसनं याबाबत कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडं (Ministry of Labour & Employment) तक्रार दाखल केली आहे. एनआयटीईएसचे अध्यक्ष हरप्रीत सलुजा (Harpreet Saluja) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ‘इन्फोसिसच्या एम्प्लॉयमेंट लेटरमध्ये (Employment Letter) समाविष्ट केलेले निर्बंध जाचक आणि कॉन्ट्रॅक्ट अॅक्टमधील (Contract Act) कलम 27नुसार बेकायदेशीर आहेत. या निर्बंधांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यावर नोकरीच्या कालावधीसोबतच नोकरी सोडल्यानंतरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. ही गोष्ट निरर्थक आहे. म्हणूनच या कॉन्ट्रॅक्टची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असं मानणं गरजेच आहे. कॉन्ट्रॅक्टमधील लादला जाणारा क्लॉज हा सेवा संपुष्टात आल्यानंतर ऑपरेट होणारा आहे. शिवाय तो खूपच व्यापकपणे शब्दबद्ध केलेला आहे. म्हणून कंपनीला त्याची अंमलबजावणी करण्यापासून थांबवलं पाहिजे. कर्मचार्यांनी कॉन्ट्रॅक्ट साइन करण्यापूर्वी त्याचं काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे. कारण एप्म्लॉयर आणि एप्म्लॉयीमध्ये बार्गेनिंग पॉवरचं (Bargaining Power) असमान वितरण आहे. त्यामुळे एप्म्लॉयर असे जाचक कॉन्ट्रॅक्ट देतात. एप्म्लॉयमेंट अॅग्रीमेंटच्यावेळी कर्मचार्यांना कदाचित या निर्बंधाची कल्पनाही दिली जात आहे. पण, नोकरीच्या उत्सुकतेपोटी अशा निर्बंधाचा फारसा विचार केला जात नाही. या अर्थानं पाहिल्यास इन्फोसिसचं सध्याचं अॅग्रीमेंट कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यातील चांगल्या नोकरीच्या संधीपासून वंचित ठेवणार आहे,’ अशी तक्रार हरप्रीत सलुजा यांनी दाखल केली आहे. एप्म्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्टमुळे कर्मचाऱ्याच्या किंवा त्यांच्या कुटुंबियाच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे कॉन्ट्रॅक्ट लागू झालं तर एम्पॉयीला उपजीविकेचं साधन उपलब्ध होणार नाही. एम्प्लॉयर आपल्या सिक्युरिटीसाठी एप्म्लॉयीवर अनावश्यकपणे निर्बंध टाकत आहे. एप्म्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्टमधून असे बेकायदेशीर, अनैतिक आणि मनमानी क्लॉज काढून टाकण्यासाठी इन्फोसिस लिमिटेडला आवश्यक आदेश जारी करण्याची विनंतीही कामगार आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे सलुजा यांनी केली आहे. तुम्हालाही Gym ट्रेनर व्हायचंय? मग शिक्षणापासून पगारापर्यंत इथे मिळेल माहिती
दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यापासून अनेकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, इन्फोसिसनं अशी अट का टाकली आहे? सध्या संपूर्ण आयटी इंडस्ट्री (IT Industry) तीव्र संकटाचा अनुभव घेत आहे. आयटीमध्ये एक प्रकारचं टॅलेंट वॉर सुरू आहे. इन्फोसिसचा अॅट्रिशन रेट (Attrition Rate) 27 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांत कंपनीतील 80 हजारांहून अधिक कर्मचार्यांनी राजीनामे दिले आहेत. इतर आघाडीच्या आयटी कंपन्यांचीही हिच स्थिती आहे. इन्फोसिसला हा प्रकार थांबवायचा आहे. म्हणून नवीन नियम लागू करून कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यापासून रोखण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
कामगार आणि रोजगार मंत्रालय एनआयटीईएसनं दाखल केलेल्या तक्रारीवर काय निर्णय घेतं, याकडे सध्या इन्फोसिस आणि तेथील कर्मचाऱ्यांच लक्ष लागलेलं आहे.