Home /News /career /

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी! भारतीय नौदलात `या` पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी! भारतीय नौदलात `या` पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Indian Navy SSC Recruitment 2022 Sarkari Naukri 2022: अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने दिलेल्या या सर्व विशेष गोष्टी काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. तसेच, या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी मिळू शकते.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : सध्याच्या काळात मनासारखी नोकरी (Jobs) मिळणं अवघड झालं आहे. कोरोनामुळे (Corona) सर्व क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. परिणामी, नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत. आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, अशी अनेक उच्चशिक्षित युवकांची इच्छा असते. अनेकजण त्यादृष्टीने प्रयत्नदेखील करतात. पण सर्वांनाच ही संधी मिळत नाही. सरकारी नोकरीनंतर बहुतांश युवकांचा कल सैन्यात (Army) नोकरी मिळवण्याकडे असतो. भारतीय सैन्यदल, नौदल किंवा हवाई दलात नोकरी मिळावी, यासाठीदेखील युवक प्रयत्नशील असतात. देशसेवा हा त्या मागचा प्रमुख उद्देश असतो. तुम्ही जर अशा नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय नौदलात (Indian Navy) 50 पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबवली जात आहे. अभियांत्रिकी शाखेची पदवी असलेल्या युवकांसाठी ही मोठी संधी आहे. त्यामुळे अशा युवकांनी तातडीने या पदासाठी अर्ज भरावा. भारतीय नौदलाने माहिती तंत्रज्ञान (IT) कार्यकारी शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Short Service Commission) अंतर्गत आधिकाऱ्यांची पदं भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौदलाच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या पदांसाठीची अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली आहे. याशिवाय उमेदवार https://www.joinindiannavy.gov.in/en/careers-jobs/executive.html या लिंकवर क्लिक करूनही या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसंच इच्छुक आणि पात्र उमेदवार Indian Navy SSC Recruitment 2022 Notification PDF च्या माध्यमातून देखील अधिकृत नोटिफिकेशन (Notification) तपासू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सुमारे 50 जागा भरल्या जाणार आहेत. Indian Navy SSC Recruitment 2022 साठी महत्त्वपूर्ण तारखा - ऑनलाइन अर्ज करण्यास प्रारंभ - 5 ऑगस्ट - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत - 15 ऑगस्ट रिक्त पदांचा तपशील (Vacant Post Details) एकूण पदांची संख्या - 50 देशातील 'कोचिंग माफियाराज' बंद करा; 'त्या' वादग्रस्त जाहिरातीवर भडकले नेटकरी Indian Navy SSC Recruitment 2022 साठी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी इच्छूक उमेदवारांनी कोणत्याही विद्यापीठ/कॉलेज/ संस्थेतून 60 टक्के गुणांसह अभियांत्रिकी (Engineering) (नियमित /एकात्मिक) पदवी मिळवलेली असावी. Indian Navy SSC Recruitment 2022 साठी वयोमर्यादा या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 1998 ते 1 जुलै 2003 दरम्यान झालेला असावा. अभियांत्रिकी शाखेची पदवी असलेल्या उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरी मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून इच्छुक उमेदवारांनी तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
    First published:

    पुढील बातम्या