मुंबई, 6 जुलै : देहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमी (आयएमए) ही भारतातील सर्वात जुन्या लष्करी अकादमींपैकी एक आहे. या ठिकाणी प्रामुख्यानं भारतीय सैन्यदलात भरती होण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. याच अकादमीमध्ये सध्या ग्रेड II आणि OG एमटी ड्रायव्हर्सची काही पदं रिक्त आहेत. ती भरण्यासाठी अकादमीनं इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अर्ज केलेल्या उमेदवारानं मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असावं. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावं. एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) आणि एमटी ड्रायव्हर (OG) या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला 81 हजार 100 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिलं जाईल. इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, दिलेल्या पदाच्या एकूण 13 जागा रिक्त आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज भरून इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे पाठवू शकतात. पोस्ट आणि पदसंख्या: इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) आणि एमटी ड्रायव्हर (OG) या पदाच्या एकूण 13 जागा रिक्त आहेत. 1- एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) - 10 जागा 2- एमटी ड्रायव्हर (OG) - 03 जागा वयोमर्यादा: एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) आणि एमटी ड्रायव्हर (OG) या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराचं वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसलं पाहिजे. वेतन: एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) - निवडलेल्या उमेदवाराला 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिलं जाईल. एमटी ड्रायव्हर (OG) - निवडलेल्या उमेदवाराला 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपयांपर्यंत मासिक वेतन दिलं जाईल. शैक्षणित पात्रता निकष: इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अर्ज केलेल्या उमेदवारानं मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असावं. एमटी ड्रायव्हर (ग्रेड II) - इच्छुक उमेदवाराकडे अवजड नागरी वाहन चालविण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. त्याला अवजड वाहने चालविण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असला पाहिजे. त्याच्याकडे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असलं पाहिजे. ऐच्छिक पात्रता - वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य दिलं जाईल. एमटी ड्रायव्हर (OG) - इच्छुक उमेदवाराकडे अवजड नागरी वाहन चालविण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. त्याला अवजड वाहने चालवण्याचा किमान 15 वर्षांचा अनुभव असला पाहिजे. त्याच्याकडे सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट असलं पाहिजे. ऐच्छिक पात्रता - वाहनाची देखभाल किंवा ट्रान्सपोर्ट सुपरवायझरच्या कामाशी संबंधित कोर्स केलेला असल्यास निवड प्रक्रियेत प्रधान्य दिलं जाईल. एचएमटीसारखा तांत्रिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्यास जास्त प्राधान्य मिळेल. अर्ज कसा करावा? इंडियन मिलिटरी अकादमी 2023 भरती अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेला अर्ज भरून इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे पाठवू शकतात. अर्ज भरण्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.