मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ICSE Result 2022: आयसीएससी बोर्डात पुण्याच्या मुलीचा देशात पहिला नंबर; महाराष्ट्राच्या पोरींची निकालावर छाप

ICSE Result 2022: आयसीएससी बोर्डात पुण्याच्या मुलीचा देशात पहिला नंबर; महाराष्ट्राच्या पोरींची निकालावर छाप

CISCE ने ICSE 10वीचा निकाल जाहीर केला आहे. ICSE 10वीच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये बसलेले विद्यार्थी CISCE वेबसाइट cisce.org वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतात.

  पुणे, 17 जुलै : राज्य बोर्ड असो की दिल्ली बोर्ड प्रत्येक निकालावर मुलींची छाप दिसत आहे. नुकताच आयसीएससी बोर्डाचा दहावीचा निकाल (ICSE Board Result 2022) जाहीर झाला आहे. यामध्ये पुण्यातील एका मुलीने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. हरगुण कौर माथरू असं या मुलीचं नाव असून तिला दहावीत 99.80 टक्के प्राप्त झाले आहेत. आयसीएसई दहावीचा एकूण निकाल 99.97 टक्के इतका लागला आहे. तर, आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्राचा निकाल 100 टक्के लागला आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्राच्या पोरींची कमाल यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. 99.98 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 99.97 टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. पुण्याची हरगुण कौर माथरू ही देशात पहिली आली आहे. ती पुण्यातील सेंट मेरिज शाळेची विद्यार्थिनी आहे. तर मुंबईच्या जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलची अमोलिका मुखर्जी ही 99.60 टक्के गुण मिळवून देशात दुसरी आली आहे. या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 39 इतकी आहे. पुण्यातील हरगुण कौर माथरू, कानपूरमधील अनिका गुप्ता, लखनऊ येथून कनिष्क मित्तल, बलरामपूरचा पुष्कर त्रिपाठी या चारही विद्यार्थ्यांना 99.80 टक्के गुण प्राप्त झाले असून चारही विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान पटकावला आहे.

  CISCEच्या मूल्यांकनाचा फॉर्मुला ठरला; CBSE अजूनही संभ्रमात? काय असेल निर्णय? इथे मिळेल माहिती

  विद्यार्थ्यांना हा पर्याय असेल आज जाहीर होणार्‍या ICSE निकाल 2022 मध्ये एखादा विद्यार्थी त्याच्या/तिच्या गुणांवर समाधानी असल्यास, त्याला/तिला उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्याची संधी मिळेल. प्रत्येक विषयाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज फक्त ऑनलाइनच स्वीकारले जातील. ICSE निकालांच्या गणनेसाठी, CISCE ने सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 या दोन्ही बोर्ड परीक्षांना समान महत्त्व दिले आहे. पंजाब बोर्डाच्या निकालांमध्येही, PSEB ने अंतिम निकालांची गणना करताना प्रत्येक दोन पदांना 40 टक्के आणि अंतर्गत मूल्यांकनाला 20 टक्के वेटेज दिले. सीबीएसईने देखील यापूर्वी म्हटल होते की टर्म 1 आणि टर्म 2 ला समान महत्त्व दिले जाईल, मात्र फसवणुकीच्या आरोपांमुळे त्याविरूद्ध निषेध करण्यात आला आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: ICSE

  पुढील बातम्या