Home /News /career /

ICG Recruitment 2022 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

ICG Recruitment 2022 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांना भारतीय तटरक्षक दलात नोकरीची संधी

भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार, एकूण 322 पदांसाठी भरती होईल. यात खलाशी जनरल ड्युटीच्या 260, खलाशी डीबी पदासाठीच्या 35, यांत्रिक मेकॅनिकलच्या 27 पदांचा समावेश आहे.

    मुंबई, 13 जानेवारी : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) उद्योग क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नुकतंच शिक्षण पूर्ण केलेले बहुसंख्य युवक नोकरीच्या शोधात आहेत. एखाद्या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करण्याची काही युवकांची इच्छा असते. त्या अनुषंगाने ते परिश्रमही घेत असतात. अशा युवकांना आव्हानात्मक काम करण्याची संधी भारतीय तटरक्षक दल अर्थात इंडियन कोस्ट गार्डने (Indian Coast Guard) उपलब्ध करून दिली आहे. भारतीय तटरक्षक दलानं खलाशी (sailor) पदाच्या भरतीकरिता प्रक्रिया (Recruitment Process) सुरू केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत उद्यापर्यंत (14 जानेवारी) आहे. याविषयीचं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे. खलाशी जीडीसह अन्य पदांसाठी अर्ज करण्याची मुदत उद्या म्हणजेच 14 जानेवरी 2022 रोजी संपत आहे. ज्या इच्छुक उमेदवारांनी अजूनही या पदांसाठी अर्ज केलेले नाहीत, त्यांनी त्वरित इंडियन कोस्ट गार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जप्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. या पदभरतीसाठीच्या नोटिफिकेशननुसार (Notification) एकूण 322 पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्जप्रक्रिया 4 जानेवारी 2022 पासून सुरू झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार, अर्जनोंदणी प्रक्रिया 14 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी joinindiacoastguard.gov.in या वेबसाइटवर जाऊन पदांसाठी आवश्यक निकषांची माहिती घ्यावी. ('आधी तू मला मार म्हणत स्वत:च्याच लगावली कानशिलात'; BJP मंत्र्याचा तो VIDEO Viral) भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार, एकूण 322 पदांसाठी भरती होईल. यात खलाशी जनरल ड्युटीच्या 260, खलाशी डीबी पदासाठीच्या 35, यांत्रिक मेकॅनिकलच्या 27 पदांचा समावेश आहे. खलाशी जनरल ड्युटी या पदासाठी इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून मॅथ्स (Maths) किंवा फिजिक्स (Physics) विषय घेऊन 12वी उत्तीर्ण झालेला असावा. खलाशी पदासाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात. यांत्रिक पदासाठी इच्छुक उमेदवार इयत्ता 10वी उत्तीर्ण, तसंच पदविकाधारक असावा. (बिकानेर अपघातीच भयानक भीषणता, 12 डब्बे घसरले, 4 डब्बे जमिनीवर कोसळले) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम joinindiacoastguard.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं. त्यानंतर वेबसाईटवरच्या होम पेजवरच्या Career@CG या ऑप्शनवर जावं. त्यानंतर ज्या पदासाठी इच्छुक आहात, त्या पदाशी संबंधित नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. नोंदणीसाठी उमेदवार मोबाईल क्रमांक किंवा ई-मेल आयडीचा वापर करू शकतात. उमेदवार नोंदणी क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीनं अर्ज भरू शकतात. अर्ज पूर्ण भरल्यानंतर त्याची प्रिंट काढावी. उमेदवारांनी अर्ज बिनचूक भरावा. कारण अर्जात पुन्हा सुधारणा करण्याची किंवा चुक दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार नाही. तसंच चुका असलेला अर्ज रद्द केला जाईल, असं भारतीय तटरक्षक दलानं स्पष्ट केलं आहे.
    First published:

    पुढील बातम्या