मुंबई, 15 जुलै : चार्टर्ड अकाउंटंट्सची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या निकालाची प्रतीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल आज किंवा उद्या जाहीर केला जाणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने मे 2022 सत्रासाठी घेतलेल्या सीए परीक्षेचा अंतिम निकाल 15 जुलै संध्याकाळी किंवा 16 जुलै रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. ICAI ने बुधवारी ट्विटरवर ही घोषणा केली.
Important Announcement - Results of ICAI Chartered Accountants Final Exams held in May 2022 are likely to be declared on Friday, 15th July 2022(evening)/Saturday, 16th July 2022. The Result can be accessed on the website - https://t.co/TAu5OcAVTf
— Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) July 13, 2022
Detailshttps://t.co/BGENMqteUg pic.twitter.com/eBNCgh8aC7
परीक्षार्थी आपला सीए फायनल परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट - https://icai.nic.in वर जाऊन पाहू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांचा ICAI CA फायनलचा निकाल त्यांच्या ईमेल आयडीवर देखील मिळू शकतो. त्यासाठी, उमेदवारांना त्यांच्या ईमेल अॅड्रेस icaiexam.icai.org या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर CA फायनल मे 2022 चा निकाल जाहीर झाल्यावर ते त्यांच्या ईमेल आयडीवर मिळू शकेल. भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी अशी सीएची परीक्षा मानली जाते. या परीक्षे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्काही कमी असते. वर्षातून दोनदा मे आणि नोव्हेंबरमध्ये ही परीक्षा घेतली जाते. यावर्षी मे 2022 ची परीक्षा 14 ते 30 मे 2022 दरम्यान आयोजित करण्यात आली होती. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवाराला एकूण किमान 50% आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळणे आवश्यक आहे. निकाल कसा तपासणार? » अधिकृत वेबसाइटवर icaiexam.icai.org किंवा caresults.icai.org वर जा. » होमपेजवरील ‘CA Final May 2022 Result’ लिंकवर क्लिक करा. » क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा. » रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक आणि पासवर्डसह लॉग-इन करा. » CA Final May 2022 स्कोअरकार्ड सबमिट करा आणि पहा. » निकाल डाउनलोड देखील करता येईल.

)







