• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • IBPS Recruitment 2021: तरुणांना क्लर्क होण्याची सुवर्णसंधी; तब्बल 5800 पेक्षा अधिक जागा रिक्त

IBPS Recruitment 2021: तरुणांना क्लर्क होण्याची सुवर्णसंधी; तब्बल 5800 पेक्षा अधिक जागा रिक्त

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 12 जुलै: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनमध्ये (IBPS) मोठ्या प्रमाणावर पदभरती करण्याची घोषणा (IBPS Recruitment 2021) करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्लर्क (Clerk) या पदासाठी ही भरती होणार असून तब्बल 5800 पेक्षा जागांसाठी भरती होणार आहे. त्यामुळे तरुण आणि अनुभवी उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पद्भारतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज 12 जुलै 2021 पासून सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी होणार भरती लिपिक (Clerk) - एकूण जागा  5800 पेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता या पदभरतीसाठी अप्लाय  करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदभरतीसाठी अप्लाय  करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. हे वाचा - Job Alert: सामान्य प्रशासन विभाग मुंबई इथे होणार पदभरती; तब्बल 66 जागा शुल्क या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी शाहुल्क आकारण्यात येणार आहे. यासाठी ओपन प्रवर्गासाठी 850/- रुपये शुल्क असणार आहे. तसंच राखीव आणि मागास वर्गासाठी 175/- रुपये शुल्क असणार आहे. ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: