Home /News /career /

देशातील टॉप नॅशनल बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी बंपर पदभरती; कधी, कसं आणि कुठे कराल अप्लाय? इथे मिळेल माहिती

देशातील टॉप नॅशनल बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी बंपर पदभरती; कधी, कसं आणि कुठे कराल अप्लाय? इथे मिळेल माहिती

IBPS जॉब्स २०२२

IBPS जॉब्स २०२२

22 ऑगस्ट 2022 ही अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत आहे. या भरतीमधून बँकांमधली एकूण 6432 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत.

    मुंबई, 03 ऑगस्ट:   द इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या संस्थेने भरतीसाठी एक निवेदन जाहीर केलं आहे. प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी (Probationary Officer/ Management Trainee) या पदांसाठी ही भरती होणार आहे. IBPS च्या ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. 1 ऑगस्ट 2022 पासून ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 ऑगस्ट 2022 ही अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत आहे. या भरतीमधून बँकांमधली एकूण 6432 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. “सहभागी बँकांमधल्या प्रोबेशनरी ऑफिसर/ मॅनेजमेंट ट्रेनी या पदांच्या निवडीसाठीची ऑनलाइन परीक्षा (प्रीलिम आणि मेन – Preliminary and Main) साधारणपणे ऑक्टोबर 2022/ नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्याचं ठरवलं आहे, ” असं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. IBPS PO Recruitment 2022 - या मुख्य तारखा लक्षात ठेवा - उमेदवारांची ऑनलाइन नोंदणी , यामध्ये बदल करणं/सुधारणा करणं (Edit/ Modification) हेही अंतर्भूत आहे : 2 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 - अर्जाची फी भरणं/ इंटिमेशन चार्जेस (ऑनलाइन) : 2 ऑगस्ट 2022 ते 22 ऑगस्ट 2022 - परीक्षेपूर्वीच्या प्रशिक्षणासाठीचं कॉल-लेटर डाउनलोड करणं : सप्टेंबर / ऑक्टोबर 2022 - परीक्षापूर्व प्रशिक्षण : सप्टेंबर / ऑक्टोबर 2022 - ऑनलाइन परीक्षेसाठीची कॉल-लेटर्स डाउनलोड करणं : पूर्वपरीक्षा : ऑक्टोबर 2022 - ऑनलाइन परीक्षा : पूर्वपरीक्षा- ऑक्टोबर 2022 - ऑनलाइन परीक्षेचा निकाल- नोव्हेंबर 2022 - ऑनलाइन परीक्षेसाठीची कॉल-लेटर्स डाउनलोड करणं – मुख्य परीक्षा : नोव्हेंबर - ऑनलाइन परीक्षा- मुख्य ; नोव्हेंबर 2022 - निकाल जाहीर होणं - मुख्य परीक्षा : डिसेंबर 2022 - मुलाखतीसाठी कॉल-लेटर्स डाऊनलोड करणं : जानेवारी/ फेब्रुवारी 2023 - प्रत्यक्ष मुलाखती : जानेवारी/ फेब्रुवारी 2023 - तात्पुरतं पदवाटप : एप्रिल 2023 IBPS PO रिक्त जागांबाबतची माहिती बँकेचं नाव आणि रिक्त पदं - बँक ऑफ बडोदा – जागा नाही - कॅनरा बँक- 2500 जागा - इंडियन ओव्हरसीज बँक- जागा नाही - UCO बँक- 550 जागा - बँक ऑफ इंडिया- 535 जागा - युनियन बँक ऑफ इंडिया- 2094 जागा - बँक ऑफ महाराष्ट्र- जागा नाही - इंडियन बँक- जागा नाही - पंजाब अँड सिंध बँक – 253 जागा IBPS PO भरती 2022 पात्रता निकष- शैक्षणिक पात्रता- भारत सरकारच्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोण्त्याही शाखेची पदवी (Graduation)किंवा केंद्र सरकारच्या वतीने याच स्तरावरील मान्य केलेली पात्रता. ऑनलाइन नोंदणी करण्याच्या दिवशी उमेदवाराने तो किंवा ती पदवी असल्याचं प्रमाण म्हणून त्याची/ तिची वैध मार्कशीट/पदवीचं सर्टिफिकेट आणि पदवी परीक्षेत किती टक्के मार्क मिळाले त्याची माहिती देणं बंधनकारक आहे. IBPS PO भरती 2022 निवड प्रक्रिया वर उल्लेख केलेल्या जागांसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी त्या खाली सांगितलेली शैक्षणिक पात्रता आणि निवड प्रक्रिया तपासून पाहावी. IBPS PO भरती 2022 - ऑनलाइन अर्ज कसा करायचा? इच्छुक आणि पात्र उमेदवार ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराने जाहिरातीत सांगितलेले पात्रतेचे आणि अन्य निकष पूर्ण करणं आवश्यक आहे.
    First published:

    पुढील बातम्या