जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IBPS PO 2022 परीक्षेचे Admit Cards जारी; अवघ्या काही दिवसांत होणार Exam; इथून करा डाउनलोड

IBPS PO 2022 परीक्षेचे Admit Cards जारी; अवघ्या काही दिवसांत होणार Exam; इथून करा डाउनलोड

IBPS RRB Recruitment 2022

IBPS RRB Recruitment 2022

अधिकृत वेबसाइट ibps.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे बँक PO ची एकूण 6432 पदे भरली जातील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 ऑक्टोबर: IBPS PO ची प्रिलिम परीक्षा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यासाठी प्रवेशपत्रे देण्यात आली आहेत. ज्या उमेदवारांनी परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइट ibps.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे बँक PO ची एकूण 6432 पदे भरली जातील. IBPS PO मॅनेजमेंट ट्रेनी प्रिलिम्स परीक्षा 15, 16 आणि 22 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. परीक्षेत एकूण 100 गुणांचे 100 प्रश्न असतील. यासाठी उमेदवारांना 60 मिनिटांचा वेळ असेल. पात्र उमेदवार मुख्य परीक्षेला बसतील. मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना तिसरा टप्पा म्हणून मुलाखतीसाठी बोलावले जाईल. घाई करा! तब्बल 1 लाख रुपये महिना पगाराची सरकारी नोकरी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक अशा पद्धतीनं डाउनलोड करा प्रवेशपत्रं सर्वप्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा. PO साठी तुमचे ऑनलाइन प्राथमिक परीक्षेचे कॉल लेटर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. एक नवीन पृष्ठ उघडेल, लॉगिन तपशील भरा आणि सबमिट करा. IBPS PO Prelims 2022 चे प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि तपासा. परीक्षा केंद्रावर नेण्यासाठी कॉपीची प्रिंट आउट घ्या. IBPS म्हणजे काय? IBPS म्हणजे Institute of Banking Personnel Selection. IBPS ही अशीच एक संस्था आहे, जी बँकेतील नोकरीसाठी परीक्षा घेते.. या संस्थेद्वारे भारतातील 11 सरकारी बँकांमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. मात्र यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची परीक्षा सामील होत नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीची परीक्षा वेगळी घेण्यात येते. काय सांगता! पात्रता 7वी पास अन् पगार तब्बल 47,000 रुपये महिना; थेट हायकोर्टात नोकरी कोणत्या बँकांमध्ये मिळते नोकरी बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक युको बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक युनियन बँक ऑफ इंडिया इंडियन बँक पंजाब अँड सिंध बँक बँक ऑफ महाराष्ट्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात