जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Success Story: झोपडपट्टीत शिक्षण, 16 फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रिया; जिद्दीने 'ती' झाली IAS ऑफिसर

Success Story: झोपडपट्टीत शिक्षण, 16 फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रिया; जिद्दीने 'ती' झाली IAS ऑफिसर

IAS उम्मुल खेर

IAS उम्मुल खेर

बालपणापासून दिव्यांग असताना झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं, कुटुंबापासून त्या दुरावल्या गेल्या, शरीरावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 08 ऑक्टोबर:   जीवनात प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येत असतात. पण त्याच्यावर मात करत जी व्यक्ती यश मिळवते ती खरी विजेता ठरते. तसं पाहायला गेलं तर संघर्षाचा ठराविक काळ असतो, परंतु आयएएस झालेल्या उम्मुल खेर यांच्या आयुष्यात संघर्षाशिवाय दुसरं काहीचं नव्हतं. पण त्यांनी कलेक्टर होण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्न इतकं मोठ होतं की, त्याच्यासमोर उम्मुल यांनी कशाचीही तमा बाळगली नाही. बालपणापासून दिव्यांग असताना झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं, कुटुंबापासून त्या दुरावल्या गेल्या, शरीरावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही अन् आयएएस होऊनच यशाला गवसणी घातली. उम्मुल यांची यशोगाथा खरोखरच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. उम्मुल या राजस्थानच्या पाली येथील रहिवासी आहेत. बालपणापासून त्या दिव्यांग होत्या. एक काळ असा होता, की त्यांचं कुटुंब त्यांच्यापासून दूर झालं. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी स्वत:चा मार्ग निवडला व त्यात आलेले अडथळेही त्यांनी स्वत: पार केलं व यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. अनेक फ्रॅक्चर आणि शस्त्रक्रिया झाल्या, पण थांबल्या नाहीत उम्मुल या राजस्थानच्या पालीतील एका गरीब मारवाडी कुटुंबातील आहेत. त्यांना बोन फ्रजाईल डिसऑर्डर हा आजार आहे. यात शरीरातील हाडं कमकुवत बनतात. उम्मुल यांच्या हाडात नेहमी फ्रॅक्चर होत असे. उम्मुल यांना आतापर्यंत 16 वेळा फ्रॅक्चर आणि 8 शस्त्रक्रियांना सामोरे जावं लागलं. व्हिडीओ गेम्स खेळण्याच्या वयात पठ्ठयानं सुरु केली कंपनी; आज 100 कोटींची उलाढाल बालपणी उद्ध्वस्त झालं घर उम्मुल यांच्या कुटुंबात आई-वडिल आणि तीन भाऊ-बहिण आहेत. उम्मुल लहान असताना त्यांचे वडिल कुटुंबासह दिल्लीतील निझामुद्दीन भागात झोपडपट्टीत राहत होते व गाडीवर कपडे विकत असत. त्यावेळी सरकारच्या आदेशानं झोपडपट्टी जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर त्याचं कुटुंब त्रिलोकपुरी झोपडपट्टीत राहायला आलं. नववीत असताना सोडलं कुटुंब उम्मुल खेर यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखीची होती. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून त्यांनी सातवीत असतानाच ट्युशन घेणं सुरू केलं. नववीत असताना त्यांच्या आईच निधन झालं व वडिलांनी दुसर लग्न केलं. उम्मुलनी शाळेत जाणं यांच्या सावत्र आईला पसंत नव्हतं. परंतु कुठल्याही स्थितीत शिक्षण सोडणं त्यांना मान्य नव्हतं म्हणून त्यांनी कुटुंबच सोडलं आणि एकट्या राहू लागल्या. शालेय जीवनात प्रस्थापित केले अनेक विक्रम उम्मुल यांना दहावीत 91 टक्के आणि बारावीत 90 टक्के गुण मिळाले. त्यांनी दिल्ली विद्यापीठातील गार्गी महाविद्यालयातून मानसशास्त्र म्हणजेच सायकॉलॉजीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर जेएनयूमधून इंटरनॅशनल स्टडिज स्कूलमधून एम.ए आणि एम फिलचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 2014 मध्ये जपानच्या इंटरनॅशनल लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्रॅमसाठी त्यांची निवड झाली. 18 वर्षांतील इतिहासात अशी निवड होणाऱ्यांमध्ये उम्मुल एकमेव भारतीय होत्या. एम फिलनंतर उम्मुल जेआरएफ उतीर्ण झाल्या. इथूनच त्यांची आर्थिक स्थिती बळकट व्हायला लागली. SSC CGL 2022: तब्बल 20,000 पदं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब; उद्याची शेवटची तारीख स्वत:चा मार्ग स्वत: तयार केला उम्मुल यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त आर्थिक अडचणींचाच सामना केला नाही तर त्यांच्या कुटुंबापासून त्यांना दूरही व्हावं लागलं. परंतु, त्यांनी परिस्थितीसमोर पराभव न मानता स्वत:चा मार्ग स्वत: निवडला व आयएएस होऊन समाजासमोर एक प्रेरणा निर्माण केली. जेआएफ करत असतानाच त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती. सीएसई 2016 परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 420 वी रँक मिळवली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात