मराठी बातम्या /बातम्या /करिअर /जोडी नंबर वन! नवऱ्याने बँकेची नोकरी सोडली, मुलांना सांभाळलं, पत्नीनेही घालून दिला असा आदर्श

जोडी नंबर वन! नवऱ्याने बँकेची नोकरी सोडली, मुलांना सांभाळलं, पत्नीनेही घालून दिला असा आदर्श

मंजुळा असे सांगतात की, मी एका शेतकऱ्याची मुलगी असल्याचा त्यांना अभिमान आहे.

मंजुळा असे सांगतात की, मी एका शेतकऱ्याची मुलगी असल्याचा त्यांना अभिमान आहे.

मंजुळा असे सांगतात की, मी एका शेतकऱ्याची मुलगी असल्याचा त्यांना अभिमान आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : असं मानलं जातं की लग्नानंतर मुली आपल्या संसारात पूर्णपणे व्यस्त होऊन जातात आणि आपल्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करून त्या आपल्या कुटुंबाप्रती एकनिष्ठ होतात. मात्र, जयपूरच्या मंजुळा भालोटिया यांनी चुकीचं सिद्ध केलं आहे. मंजुळा यांनी लग्नानंतर उत्तरप्रदेश उच्च न्यायिक सेवा परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तसेच प्रथम क्रमांक मिळवून न्यायाधीश बनलेल्या मंजुळा या दोन मुलांची आई आहेत. ज्या महिलांना लग्नानंतर आणि आई बनल्यानंतरही काहीतरी करून आपले ध्येय गाठायचे आहे, अशा सर्व महिलांसाठी मंजुळा यांची कथा ही प्रेरणादायी आहे,

पतीमुळे स्वप्न पूर्ण -

मात्र, त्यांच्या यशाचे श्रेय एकट्या मंजुळा यांना जात नाही. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, अशी एक म्हण आहे, पण मंजुळा भालोटिया यांच्या बाबतीत ही म्हण पूर्णपणे उलट दिसते, कारण त्यांचे ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या पतीने त्यांला चांगली साथ दिली. मंजुळा यांना त्यांचा अभ्यास पूर्ण करता यावा आणि आपले ध्येय गाठता यावे म्हणून त्यांच्या पतीने आपली आकर्षक बँकेची नोकरी पणाला लावली आणि मुलांचा सांभाळ करण्यास सुरुवात केली. खर्‍या अर्थाने मंजुळा यांचे पती सुमितने आयुष्याचा जोडीदार होण्याचे कर्तव्य पार पाडले आहे.

मंजूळा या जयपूरच्या -

मंजुळा भालोटिया या उत्तर प्रदेशच्या उच्च न्यायिक सेवा परीक्षेत अव्वल ठरल्या आहेत. मंजुळा या राजस्थानमधील जयपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी हरियाणातील रोहतकमध्ये लग्न करून यूपीमध्ये आपले नाव चमकवले आहे. अशा स्थितीत राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये त्यांच्या यशामुळे आनंदाचे वातावरण आहे.

मंजुळा भालोटिया या राजस्थानच्या जयपूर येथील रहिवासी आहेत. 2003 मध्ये त्यांनी सफिया कॉलेज अजमेरमधून इकॉनॉमिक्स ऑनर्स केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्या लंडनला गेल्या. 2005 मध्ये त्यांनी लंडनमधील लीड बिझनेस स्कूलमधून एमबीएची पदवी मिळवली. यानंतर 2009 मध्ये त्यांची भेट सुमित अहलावत यांच्यासोबत झाली आणि या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर मंजुळाने राजस्थानमधून एलएलबीची पदवी घेतली. UK मधून MBA ची पदवी घेतल्यानंतर मंजुळा यांनी बार्कलेज बँकेत 2 वर्षे नोकरीही केली. तसेच एलएलबी केल्यानंतर मंजुला यांनी भगतसिंग फूल सिंग युनिव्हर्सिटी खानपूर सोनीपतमधून एलएलएमची पदवीही मिळवली आहे.

एलएएम केल्यानंतर, मंजुळाने त्यांच्या पतीसमोर न्यायाधीश बनण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पतीने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. पत्नीची इच्छा त्यांनी आपली इच्छा बनवली. यानंतर मंजुळा यांनी उत्तर प्रदेश न्यायिक सेवेची माहिती गोळा केली आणि मेहनत घेतली. अभ्यासासोबतच दोन मुलांचा सांभाळ करणे हे त्यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हते, त्यानंतर मंजुळाच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्या पतीने बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि मुलांचा आणि कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली.

हेही वाचा - Success Story : दहावीत काठावर पास, मात्र कष्टाच्या जोरावर झाला IAS

तसेच सुमितने मंजुळाला खूप प्रोत्साहन दिले. 2016 मध्ये, मंजुळाने कायद्याच्या परीक्षेत भाग घेण्याचे ठरवले आणि 2020 मध्ये त्यांनी यूपी न्यायिक सेवा परीक्षेत भाग घेतला. ऑगस्ट 2022 मध्ये या परीक्षेसाठी मुलाखती घेण्यात आल्या. यानंतर 12 सप्टेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने यूपी उच्च न्यायिक सेवा निकाल जाहीर केला होता. यामध्ये 31 उमेदवारांच्या यादीत मंजुळा यांनी पहिला क्रमांक पटकावला. या यादीत 23 पुरुष आणि 8 महिलांची निवड करण्यात आली आहे.

शेतकऱ्याची मुलगी झाली न्यायाधीश -

मंजुळा असे सांगतात की, मी एका शेतकऱ्याची मुलगी असल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांनी शेतीच्या कामातही वडिलांना मदत केली. आता त्यांची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पदासाठी निवड झाली आहे. प्रामाणिक आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही व्यक्ती काहीही साध्य करू शकते, असे त्या म्हणतात. सासरे आणि पती सुमित यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे मंजुळा सांगतात. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसून "दूध का दूध आणि पानी का पानी करणार" असल्याचं त्या सांगतात.

First published:

Tags: Court, Education, Inspiration, Success story, Uttar pradesh