मराठी बातम्या /बातम्या /करिअर /जर्मनीतली नोकरी सोडून दाम्पत्यानं देशात सुरू केला मखाणा उद्योग; दोन वर्षांत 30 कोटींची उलाढाल

जर्मनीतली नोकरी सोडून दाम्पत्यानं देशात सुरू केला मखाणा उद्योग; दोन वर्षांत 30 कोटींची उलाढाल

जर्मनीतली नोकरी सोडून दाम्पत्यानं देशात सुरू केला मखाणा उद्योग; दोन वर्षांत 30 कोटींची उलाढाल

जर्मनीतली नोकरी सोडून दाम्पत्यानं देशात सुरू केला मखाणा उद्योग; दोन वर्षांत 30 कोटींची उलाढाल

Success Story : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने मखाणाला भौगोलिक निर्देशन अर्थात GI टॅग दिला आहे, तेव्हापासून बिहार राज्यातल्या पूर्णिया, सीमांचल आणि मिथिलांचलमधला मखाणा परदेशही गाजवतो आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  पूर्णिया (बिहार), 30 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने मखाणाला भौगोलिक निर्देशन अर्थात GI टॅग दिला आहे, तेव्हापासून बिहार राज्यातल्या पूर्णिया, सीमांचल आणि मिथिलांचलमधला मखाणा परदेशही गाजवतो आहे. पूर्णियातले उद्योजकही या संधीचा चांगला लाभ घेत आहेत. तिथल्या अशाच एका तरुण जोडप्याची यशोगाथा प्रेरक आहे. त्यांनी कोरोना काळात परदेशातली चांगली नोकरी सोडून पूर्णियामध्ये मखाणाविषयक स्टार्टअप कंपनी सुरू केली. अवघ्या दोन वर्षांतच त्यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 30 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

  पूर्णियाची तरुण उद्योजिका लिली आणि तिचे पती श्वेतांशू यांनी ऑरगॅनिक सत्त्व या नावाने मखाणाचा बिझनेस सुरू केला. या स्टार्टअप कंपनीमुळे 600 जणांना रोजगार मिळाला आहे. पूर्णियातल्या सेंद्रिय मखाण्याचा स्वाद जगभरातल्या अनेक देशांना या माध्यमातून चाखायला मिळत आहे.

  लिली झा यांनी सांगितलं, की त्यांनी मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं आणि त्या एका मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर होत्या. त्यांचे पती श्वेतांशू जर्मनीत एका आयटी कंपनीत चांगली नोकरी करत होते. दोघांनीही नोकरी सोडली आणि पूर्णियात मखाणाच्या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी आता 11 फ्लेवर्समध्ये मखाणा विकते. या कंपनीचा मखाणा अमेरिका, सिंगापूर, यूके आदींसह अनेक देशांमध्ये पाठवला जातो. भारतात रिलायन्स, पतंजली अशा अनेक नामवंत कंपन्या या कंपनीकडून मखाणाची खरेदी करतात.

  हेही वाचा: Competitive Exams: MPSC असो वा NEET कोणतीही स्पर्धा परीक्षा एका झटक्यात होईल क्रॅक; अशी करा स्मार्ट स्टडी

  आधीपासूनच या दाम्पत्याला असं वाटत होतं, की अशा एखाद्या स्टार्टअपवर काम करावं, जेणेकरून बिहारला वेगळी ओळख मिळेल आणि बिहारच्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. आज 600 स्त्री-पुरुषांना त्यांच्या कंपनीने रोजगार दिला आहे. कंपनीचे पार्टनर अमित यांनी सांगितलं, की त्यांनी लिली-श्वेतांशू या दाम्पत्याच्या जोडीने सेंद्रिय मखाणा उत्पादन सुरू केलं. त्यामुळे आता बिहारचा मखाणा परदेशवासीयांनाही चाखायला मिळत आहे.

  GI मिळण्यापूर्वी मखाणा हे बिहारचं उत्पादन बाहेरची काही माणसं कमी किमतीत खरेदी करून उत्तम किमतीत विकायचे. आता आम्ही हे उत्पादन इथेच खरेदी करतो आणि त्यावर प्रक्रिया करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं उत्पादन तयार करतो. तसंच वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये त्याचं पॅकिंग करून मोठ्या कंपन्यांसह परदेशातही त्याचा पुरवठा करतो. त्यामुळे इथले शेतकरी आणि मखाणा फोडणाऱ्या स्थानिक कामगारांना चांगलं उत्पादन मिळतं. त्यामुळेच इथल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय ओळखही मिळते, असं त्यांनी सांगितलं.

  यांच्या प्रयत्नांतूनच मखाणावर 5 टक्के जीएसटीही लागू करण्यात आला. त्यामुळे आता बिहार सरकारलाही यातून कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होत आहे. मखाणा उद्योगात काम करणाऱ्या सीता नावाच्या एका महिलेने सांगितलं, की तिच्या जवळपास 80 जण या उद्योगात काम करतात. ती दिवसाला घरात बसूनच 800 ते 1000 रुपयांची कमाई करते. काम करणाऱ्यांना चांगल्या सुविधाही कंपनीकडून दिल्या जत असून, पैसे वेळेवर दिले जात आहेत. त्यामुळे मखाणा उद्योगातून त्यांना चांगला फायदा होत आहे.

  First published:

  Tags: Business, Inspiration, Success story