मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: ना नोकरी जाण्याची भीती, ना मंदीचं संकट; 'या' क्षेत्रात जॉब मिळाला तर लाईफ सेट

Career Tips: ना नोकरी जाण्याची भीती, ना मंदीचं संकट; 'या' क्षेत्रात जॉब मिळाला तर लाईफ सेट

लगेच मिळेल नोकरी

लगेच मिळेल नोकरी

HR प्रोफेशनल नक्की व्हावं तरी कसं? HR होण्यासाठी कोणते कोर्सेस आवश्यक आहेत? हे आज आम्ही तुम्हाला Human Resources Professional Day च्या निमित्याने सांगणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 सप्टेंबर: आजकाल अर्थव्यवस्था डबघाईला आल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात मंदी सुरु आहे. कोणती कंपनी थेट कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. तर कोणती कंपनी काढण्याची धमकी देत आहे. त्यामुळे कर्मचारी बरेच टेन्शनमध्ये आहेत. आपल्यालाही अशी नोकरी असावी जी कधीच जाण्याची भीती असू नये तसंच मंदीचं संकट असू नये असं प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटतं. असं क्षेत्रं आहे आणि ते क्षेत्रं म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच HR.

कोणत्याही कंपनीत जॉब मिळवण्यासाठी आधी त्या कंपनीच्या HR सोबत कॉन्टॅक्ट करावा लागतो. त्यानंतर HR मुलाखत घेऊन तुम्ही योग्य आहात की नाही हे तुमचा Resume बघून ठरवतात. त्यामुळे कंपनीत कोण काम करेल हे ठरवण्यात HR चा मोठा वाटा असतो. म्हणून HR ची नोकरी सुरक्षितही मानली जाते. पण HR प्रोफेशनल नक्की व्हावं तरी कसं? HR होण्यासाठी कोणते कोर्सेस आवश्यक आहेत? हे आज आम्ही तुम्हाला Human Resources Professional Day च्या निमित्याने सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मानव संसाधन व्यवस्थापक म्हणजेच एचआर व्यक्ती ही कोणत्याही कंपनी, संस्था किंवा संस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असते. संस्थांचे काम सुरळीत चालण्यासाठी मानव संसाधन विभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणूनच, जर तुमचीही या क्षेत्रात करिअर करायची इच्छा असेल, तर तुम्ही बारा वी नंतर एचआर मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा किंवा बीबीए इन एचआर कोर्स करून या क्षेत्रात प्रवेश करू शकता.

1-2 नव्हे तब्बल 5000 Vacancy; SBI Clerk 2022 परीक्षेचा फॉर्म भरलात की नाही? उद्याची शेवटची तारीख

पदवीनंतर तुम्ही ह्युमन रिसोर्समधील एचआर कोर्समध्ये एमबीए देखील करू शकता. इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत एमबीए हा खूप चांगला अभ्यासक्रम आहे. HR मध्ये MBA किंवा PGDM असलेल्या उमेदवारांना या क्षेत्रात प्राधान्य देण्यात येतं.

कुठे मिळेल नोकरी

आजकाल सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये एचआर मॅनेजरची नियुक्ती केली जाते. हॉस्पिटल असो की इतर कंपनी, कॉलेज, युनिव्हर्सिटी, प्रायव्हेट फर्म, सर्वत्र ह्युमन रिसोर्स मॅनेजरसाठी नोकरीच्या संधी आहेत. या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. उत्पादन आणि सेवेशी संबंधित प्रत्येक उद्योगात एचआर विभाग नक्कीच असतो. तुम्ही या सर्व ठिकाणी नोकऱ्या शोधू शकता. सध्याच्या काळात असे कोणतेही क्षेत्र नाही, जिथे एचआर विभाग नाही आणि या ठिकाणी काम करण्यासाठी एचआर मॅनेजरची नियुक्ती केली जाते. त्यामुळे यातील करिअर स्कोपबद्दल शंका नाही. तुमच्यात टॅलेंट असेल तर नोकरीसाठी भटकंती करावी लागणार नाही.

तुम्हालाही ऑफिसमध्ये सतत भीती वाटते का? मग असे निघा कम्फर्ट झोनच्या बाहेर

HR ला किती मिळतो पगार

तुम्ही कोणत्याही IIM किंवा IIT कॉलेजमधून किंवा इतर कोणत्याही चांगल्या कॉलेजमधून HR कोर्समध्ये MBA किंवा PGDM करत असाल, तर तुमचा सुरुवातीचा पगार 1.5 लाख ते 2 लाखांपर्यंत सहज उपलब्ध आहे. अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला दरमहा 20 ते 30 लाख सहज मिळू शकतात.

First published: