मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

नोकरी शोधताय? मग मोबाईलमध्ये 'या' टॉप Job Apps आहेत ना? नसतील तर आजच करा डाउनलोड

नोकरी शोधताय? मग मोबाईलमध्ये 'या' टॉप Job Apps आहेत ना? नसतील तर आजच करा डाउनलोड

जाणून घ्या काही टॉप वेबसाईट्स आणि Apps

जाणून घ्या काही टॉप वेबसाईट्स आणि Apps

आज आम्ही तुम्हाला अशा काही टॉप वेबसाईट्स आणि Apps सांगणार आहोत ज्यांचा उपयोग करून तुम्हाला लगेच नोकरी मिळू शकते.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 26 डिसेंबर: कोरोनाकाळात (Mumbai Corona updates) सर्वच लोकांचे अक्षरशः हाल झालेत. कोणाचा व्यवसाय बुडाला, कोणाची नोकरी (latest Jobs) गेली तर कोणी कर्जबाजारी झाले. यात सर्वाधिक प्रमाण होतं ते म्हणजे नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांचं. ऐन कोरोनाकाळात नोकरी गेली, बाहेर सगळं बंद आता नोकरी शोधणार कशी? (How to search Jobs) हाच यक्षप्रश्न कर्मचाऱ्यांपुढे उभा होता. अजूनही काही कर्मचाऱ्यांना नोकरी मिळण्यात (How to get Jobs) अडचणी येत आहेत. कंपन्यांमध्ये जाऊन CV देऊन झाले, ओळखीच्या व्यक्तींशी बोलूनही झालं पण काहीच उपयोग होत नाही. नक्की नोकरी शोधणार कशी? हाच प्रश्न तुमच्यासमोरही असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टॉप वेबसाईट्स (Top Job searching websites) आणि Apps (Job searching Apps) सांगणार आहोत ज्यांचा उपयोग करून तुम्हाला लगेच नोकरी मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया. LinkedIn    LinkedIn हे अप्लिकेशन अनेकांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे वाटू शकतं. मात्र LinkedIn असं अजिबात नाही. इथे जॉब शोधण्याच्या सोबतच तुम्ही काम करू इच्छिणाऱ्या कामाच्या मोठ्या पदावरच्या व्यक्तींबरोबर संवाद साधता येतो. तसंच इथे निरनिराळ्या कंपन्या जॉब्स पोस्ट करत असतात. त्यामुळे इथे जाऊन तुम्हाला जॉबसाठी अप्लाय करणं सोपं असतं. तसंच तुमच्यातील काही स्पेशल स्किल्स, तुमचं शिक्षण याबद्दल तुम्ही अपडेट करत राहू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार चांगला जॉब मिळू शकेल. Resume Tips: बायोडेटा बनवताना काही नियमांमध्ये करा बदल; तुम्हालाच मिळेल नोकरी Naukari.com Naukari.com ही एक स्वतंत्र जॉब सर्चिंग वेबसाईट आहे तसंच या वेबसाईटची अप्लिकेशनही उपलब्ध आहे. इयथे जगभरातील जॉब्स पोस्ट होत असतात. त्यामुळे तुम्हाला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात नोकरी हवी असेल तर मिळू शकते. विशेष म्हणजे इथे तुमच्या शिक्षणानुसार आणि जॉब टायटलनुसार नोकरी शोधण्याची मुभा असते. त्यास्तही तुंहाला तुमचा ई-मेल आयडी आणि संपूर्ण बायोडेटा इथे अपलोड करावा लागतो. यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यास सुरुवात होते. Indeed Naukari.com प्रमाणेच Indeed हे सुद्धा जॉब सर्चिंग अप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही सोप्या पद्धतीनं जॉब्स शोधू शकता. तुमचा बायोडेटा अपलोड केल्यानंतर तुमच्यातील स्किल्सनुसार तुम्हाला जॉब्सच्या नोटिफिकेशन्स मिळतात. एकदा जॉबसाठी अप्लाय केल्यानंतर तुमची अप्लिकेशन आवडल्यास कंपनीकडून तुम्हाला मुलाखतीचा कॉल येतो. ही एक वापरण्यास सोपी अशी अप्लिकेशन आहे. Career Tips: मेडिकल क्षेत्रातील 'हे' कोर्सेस केल्यानंतर लगेच मिळू शकते नोकरी Monster.com Monster.com ही जॉब सर्चिंग वेबसाईट अप्लिकेशन आहे. इथे तुम्हाला सरकारी आणि खासगी असे दोनही प्रकारचे जॉब्स बघायला मिळतात. इथेही आपला बायोडेटा अपलोड करून तुम्ही जॉबचे नोटिफिकेशन्स मिळवू शकता. वरील काही वेबसाईट्स आणि अप्लिकेशन्सवर रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावं लागू शकतं. त्यामुळे उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करताना काळजीपूर्वक रजिस्टर करावं.
First published:

Tags: Career, Jobs, Tips

पुढील बातम्या