जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Job Tips: एकाचवेळी 2-3 जॉबची ऑफर आलीये? मग अशा पद्धतीनं Reject करा इतर कंपन्यांचं ऑफर लेटर

Job Tips: एकाचवेळी 2-3 जॉबची ऑफर आलीये? मग अशा पद्धतीनं Reject करा इतर कंपन्यांचं ऑफर लेटर

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

पनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to reject job offer) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही कंपनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 एप्रिल: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 2 वर्षांपासून नोकरीच्या मार्केटमध्ये (How to get Job) प्रचंड गोंधळ उडाला होता. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. 2022 मध्ये, जॉब मार्केट पुन्हा चांगले होत आहे आणि लोक नोकऱ्यांसाठी अर्ज (How to apply for private jobs) करत आहेत. अशा परिस्थितीत कधी-कधी अनेक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर (How to accept job offers) येतात. इतकंच नाही तर एकाच वेळी अनेक कंपन्यांच्या ऑफर्सही येऊ शकतात. उमेदवारांना अशावेळी समजत नाही की नक्की कोणत्या कंपनीची ऑफर स्वीकारावी (Job Acceptance letter). एका कंपनीची ऑफर स्वीकारून दुसऱ्या कंपनीला नाही (How to reject job offer) कसं म्हणावं हे बऱ्याच उमेदवारांना समजत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to reject job offer) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही कंपनीची जॉब ऑफर रिजेक्ट करता येईल. रिटायर्ड अधिकाऱ्यांनो, तुमच्यासाठी पर्यटन मंत्रालयात नोकरीची मोठी संधी; असं करा अप्लाय कुठेतरी नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर तिथल्या कॉल लेटरची आतुरतेने वाट पाहत असताना काही लोक एकाच वेळी अनेक ठिकाणी अर्ज करतात, परीक्षा आणि मुलाखतही देतात. त्यानंतर दोन किंवा अधिक कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या, तर त्या कंपन्यांना नकार देणे कठीण होते. तुमच्यासोबतही असे घडले असेल, तर तुम्ही नम्रपणे नोकरीची ऑफर नाकारली पाहिजे. अशा प्रकारे नोकरीची ऑफर करा रिजेक्ट जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कंपन्यांकडून नोकरीची ऑफर आली असेल आणि तुम्ही त्यापैकी कोणत्याही एका कंपनीला हो म्हणण्याचा निर्णय घेतला असेल तर आता इतर कंपन्यांना नाही म्हणण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत, आपण अत्यंत नम्रपणे नकार दिला पाहिजे. जर तुम्ही समोरच्या कंपनीला नाही म्हटले तर ते तुमच्या करिअरच्या वाढीमध्ये अडथळा ठरू शकते. उन्हाळ्याच्या सुटीत पुस्तकांना बनवा तुमचे मित्र; ‘ही’ IMP पुस्तकं एकदा वाचाच

 कंपनीला कॉल करून नकार द्या. अशा गोष्टी केवळ मेसेजद्वारे बोलणे टाळा. धन्यवाद देऊन तुमचे बोलणे सुरू करा. तुम्हाला नोकरीसाठी योग्य समजल्याबद्दल आणि मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार. नोकरीची ऑफर नाकारताना कठोर शब्द किंवा शब्द वापरू नका. मुलाखतीदरम्यान तुमच्यासोबत काही नकारात्मक घटना घडली असेल, तर नोकरीची ऑफर नाकारताना त्याचा उल्लेख करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात