जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक; अशा पद्धतीनं करा Improve

Career Tips: कॉर्पोरेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक; अशा पद्धतीनं करा Improve

 कम्युनिकेशन स्किल्ससाठी काही टिप्स

कम्युनिकेशन स्किल्ससाठी काही टिप्स

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to improve Communication Skills) देणार आहोत ज्यामुळे तुमचे कम्युनिकेशन स्किल्स नक्की सुधारतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल: आजकालच्या काळात तुमच्याकडे बोलण्याची क्षमता (communication skills) असेल तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. पण आता तुम्ही म्हणाल की फक्त बोलून कसं कोणाला यश (Success Tips) मिळेल? मात्र हे खरंय. बोलणे म्हणजेच Communication. म्हणजेच जर तुमच्याकडे Communication Skills असतील तर तुम्ही करिअरमध्ये (Communication Skills Tips) समोर जाऊ शकता. पण अनेक लोकांकडे चांगले कम्युनिकेशन स्किल्सच (How to Improve Communication Skills) नसतात. यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नोकरीमध्येही हे स्किल्स नसल्यामुळे प्रमोशन (How to get Promotion in Job) होऊ शकत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips to improve Communication Skills) देणार आहोत ज्यामुळे तुमचे कम्युनिकेशन स्किल्स नक्की सुधारतील. चला तर मग जाणून घेऊया. दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या जर तुम्हाला तुमचे संभाषण कौशल्य सुधारायचे असेल, तर तुम्हाला इतरांचे म्हणणे फार काळजीपूर्वक ऐकावे लागेल. याद्वारे तुम्ही त्याचे शब्द अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. सुरुवातीला तुमच्या बोलण्यात काही चुका होऊ शकतात, पण जेव्हा तुम्ही रोज सराव करत राहाल तेव्हा चुका कमी होतील आणि तुम्ही योग्य प्रकारे संवाद साधू शकाल. म्हणूनच काहीही नीट ऐका, मग बोलायला शिका. Government Job : MPSC च्या ‘या’ पदांसाठी मोठी संधी; 10 वी पास करू शकतात अप्लाय! योग्य जागी योग्य शब्दांचा वापर करा एखाद्याशी बोलताना योग्य शब्द वापरावेत. यासाठी रोज नवीन शब्द शिका आणि लोकांशी बोलताना त्यांचा वापर करा. सुरुवातीला तुम्हाला लोकांशी बोलताना तुमचा आवाज मंद ठेवावा लागतो आणि योग्य शब्द बोलावे लागतात, बरेचदा असे घडते की घाईत लोक संवाद साधताना चुकीचे शब्द वापरतात, तुम्हाला हळू बोलायचे असते आणि तुमचे शब्द वापरायचे असतात, स्पष्टपणे बोलावे लागते. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुमचा मुद्दा अधिक चांगल्या प्रकारे समजेल. रोज सराव करणं आवश्यक जर तुम्हाला तुमचे संवाद कौशल्य मनापासून सुधारायचे असेल तर तुम्हाला दररोज सराव करावा लागेल. तुम्हाला दैनंदिन संभाषणातील काही शब्द लक्षात ठेवावे लागतील आणि हे आठवलेले शब्द आठवड्यातून दोनदा पुन्हा करा. कारण एकदा वाचून पुन्हा पाहिल्यास विसराल. तुमच्या संवादाला रोज थोडा वेळ द्या, रोज काही नवीन शब्द शिका. हे तुमचे संवाद कौशल्य सुधारेल. मोठी बातमी! आठवड्याला 12 तास काम, जास्त PF; 1 जुलैपासून होणार ‘हे’ बदल? पॉइंट टू पॉइंट बोला तुम्ही तुमच्या मित्राशी बोलत असाल किंवा इतर कोणाशी तरी. बोलत असताना लक्षात ठेवा की तुम्हाला पॉइंट टू पॉइंट बोलायचे आहे. कुणाशी बोलायचे असेल तर न घाबरता मोकळेपणाने बोलले पाहिजे. जर तुम्ही इकडे तिकडे बोलाल तर तुम्हाला ज्या मुद्द्यावर बोलायचे आहे ते तुम्ही करू शकणार नाही. तसेच समोरच्या व्यक्तीचाही गोंधळ उडेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात