जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / फ्रेशर्स असूनही मोठ्या सॅलरीची नोकरी हवीये? मग काम कठीण नाहीये; फक्त या स्टेप्स करा फॉलो

फ्रेशर्स असूनही मोठ्या सॅलरीची नोकरी हवीये? मग काम कठीण नाहीये; फक्त या स्टेप्स करा फॉलो

फ्रेशर्स असूनही मोठ्या सॅलरीची नोकरी हवीये? मग काम कठीण नाहीये; फक्त या स्टेप्स करा फॉलो

कामाचा अनुभव नसल्यामुळे कोणतीही कंपनी त्यांना कामावर घेत नाही आणि ते इकडे तिकडे अर्ज करत राहतात. थोडं मन लावलं तर एखादी नोकरी अगदी फ्रेशर म्हणूनही सहज मिळवता येते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 ऑक्टोबर: नेहमी अनुभवी उमेदवारांना जॉबमध्ये प्राधान्य दिलं जातं. अनुभवी उमेदवार असतील तर ते अधिक चांगल्या पद्धतीनं का करू शकतील असं अनेक कंपन्यांना वाटतं. मात्र यामुळे फ्रेशर्सना जॉब मिळू शकत नाही. जर तुम्हीही फ्रेशर असाल तर याबाबत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही फ्रेशर्स असाल तरी तुम्हाला जॉब मिळू शकतो. चला तर मग जाणून घेउया काही टिप्स. फ्रेशर म्हणून नोकरी मिळवणे सोपे नाही. कामाचा अनुभव नसल्यामुळे कोणतीही कंपनी त्यांना कामावर घेत नाही आणि ते इकडे तिकडे अर्ज करत राहतात. थोडं मन लावलं तर एखादी नोकरी अगदी फ्रेशर म्हणूनही सहज मिळवता येते. यासाठी तुम्हाला एक खास योजना बनवावी लागेल. सुरुवातीला Internship शोधा जर फ्रेशर म्हणून नोकरी शोधण्यात अडचण येत असेल, तर आधी चांगल्या कंपनीत इंटर्नशिप करणे अधिक योग्य ठरेल (Job Tips For Freshers). याच्या मदतीने तुम्हाला वर्क कल्चर समजण्यास सुरुवात होईल आणि इंडस्ट्रीमध्ये संपर्क निर्माण करण्यातही मदत होईल. इंटर्नशिप (Internship for freshers) दरम्यान शक्य तितक्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे सर्वोत्तम द्या. ‘या’ मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये पर्मनंट वर्क फ्रॉम होम जॉब्स; लगेच करा अप्लाय

अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घ्या

प्रथमच नोकरी मिळवणे सोपे नाही. प्रथम संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांशी ओळख करून घ्या आणि स्वत:ला मार्गदर्शक बनवा, जो तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. सोशल मीडिया, शाळा-कॉलेजमधील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत राहा. प्रोफाइल बिल्ड करत राहा तुमचा Resume आकर्षक बनवण्यासाठी, त्यात पात्रतेसह काही स्किल सेट जोडा. तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या नोकरीसाठी काम येणारे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स (Online certification courses) करा. यामुळे तुमचा CV प्रभावी होईल अर्ज शुल्क अवघे 25 रुपये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी; घाई करा; ही घ्या लिंक

Techie बना

सध्या केवळ अभ्यासक्रमाचे ज्ञान पुरेसे नाही. गर्दीपासून दूर राहून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुमचे तांत्रिक ज्ञान (Technology friendly) वाढवा. तंत्रज्ञानातील प्रगतीसह अद्ययावत रहा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात