मुंबई, 23 सप्टेंबर: हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडनं (HCL) पहिल्यांदाच फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर प्रोग्रामचं (HCL career program for freshers) आयोजन केलं आहे. जर तुम्हालाही तुमचं करिअर (Career at HCL) सुरू करण्यासाठी कोणत्या चांगल्या कोर्सची (HCL Career Program details) गरज असेल तर तुम्ही या प्रोग्रामसाठी लगेच अप्लाय (HCL Career Program apply online) करू शकता. गेल्या काही काळातील IT कंपन्यांमधील जॉब्सचं (Latest IT Jobs) प्रमाण बघता या प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यानं चांगली नोकरी नक्की मिळू शकणार आहे. BE/ B.Tech/ MCA/ M.Tech/ M.Sc कम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT मध्ये तुमचं शिक्षण झालं असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. हा प्रोग्राम पूर्ण करून तुम्हाला उत्तम IT कंपनीमध्ये जॉब मिळू शकणार आहे. IT इंजिनिअर (IT engineer Jobs) किंवा BCA मधून पदवीधर विद्यार्थी या कोर्ससाठी अप्लाय करू शकणार आहेत. 2018, 2019, 2020 आणि 2021 बॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे. हे वाचा - धक्कादायक! वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन कामासाठी घातक; Microsoft च्या अभ्यासातून खुलासा कसं असेल प्रोग्रामचं स्वरूप HCL चा करिअर प्रोग्राम 6 महिन्यांचा असणार आहे. यात 3 महिने virtual क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे. विशेष म्हणजे हे ट्रेनिंग तुम्हाला आपल्या घरी राहूनच करता येणार आहे. तर त्यानंतरचे तीन महिने हे ट्रेनिंग तुम्हाला HCL Technologies च्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण करावं लागणार आहे. या प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांना 1.5 लाख आणि त्यासोबत टॅक्सेस असं शुल्क भरावं लागणार आहे. भविष्यातील संधी या प्रोग्रामनंतर काही उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही निवड पूर्णतः तुमच्या कामावर आणि प्रोग्राममधील प्रगतीवर अवलंबून असणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना IT Engineer, Analyst, Design Engineer या पदांवर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये उमेदवारांना INR 2.75 लाख रुपये प्रतिवर्ष पगार देण्यात येणार आहे. हे वाचा - MAHAGENCO Recruitment: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत इंजिनिअर्ससाठी भरती पात्रतेचे निकष लखनऊ, नागपूर, विजयवाडा, मदुराई या शहरांमधील फ्रेशर्स इंजिनिअर्ससाठी ही संधी असणार आहे. तीन महिन्यांच्या प्रोग्रामनंतर या उमेदवारांना त्या शहरांमधील ऑफिसमध्ये जाऊन ट्रेनिंग घेता येणार आहे. उमेदवारांना बारावी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणामध्ये 65 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. या संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना HCL टेक्नॉलॉजीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवता येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.