Home /News /career /

मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

मंत्रालयात सरकारी नोकरीची संधी; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

उमेदवार या पदांसाठीची जाहिरात जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत वेबसाईटवर उपलब्ध नमुन्यानुसार, अर्ज भरू शकतात.

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. भारत सरकारच्या कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत, अनेक रिक्त जागांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन यासाठी अर्ज करू शकता. या भरतीसाठी 44900 ते 142400 पर्यंत वेतन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या पदांसाठी व्हॅकेन्सी - कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या विभागात उर्दू, कोकणी, नेपाळी, संथाली आणि तमिळ भाषांसाठी वैयक्तिक सहाय्यक (प्रादेशिक भाषा) अशा पाच पदांसाठी भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारांना 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याशिवाय संबंधित भाषांव्यतिरिक्त कम्प्यूटरमध्ये निपुण असणं आवश्यक आहे. अर्जदाराचं वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावं. उमेदवार http://leligslative.gov.in/documents/recruitment या लिंकवर जाऊन या पदांसाठी संबंधित पात्रता, पदांसाठीचे निकष आणि इतर तपशील मिळवू शकतात. असा करा अर्ज - उमेदवार या पदांसाठीची जाहिरात जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत वेबसाईटवर उपलब्ध नमुन्यानुसार, अर्ज भरू शकतात. आरके शर्मा, अवर सचिव, भारत सरकार कायदा आणि न्याय मंत्रालय विधान विभाग, रूम नंबर 412 बी, ए विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली येथए अर्ज जमा करावा लागेल.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Sarkari Naukari

    पुढील बातम्या