मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Government Job: तुम्हीही शोधताय सरकारी नोकरी? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

Government Job: तुम्हीही शोधताय सरकारी नोकरी? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

सरकारी नोकरी

सरकारी नोकरी

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांकरिता एक चांगली बातमी आहे. टेक्निकल इंटेलिजन्स एजन्सीमध्ये नोकरी करण्याची संधी युवकांसाठी चालून आली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 4 जानेवारी- सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांकरिता एक चांगली बातमी आहे. टेक्निकल इंटेलिजन्स एजन्सीमध्ये नोकरी करण्याची संधी युवकांसाठी चालून आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (NIELIT) आणि नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) या संस्थांमध्ये एव्हिएटर II आणि टेक्निकल असिस्टंट या पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ntro.gov.in या NTROच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतील. NTRO Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

    https://ntro.gov.in/ntroWeb/load या लिंकवर जाऊन या पदांसाठी थेट अर्ज करणं शक्य आहे. अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://images.news18.com/ibnkhabar/uploads/2022/12/NTRO-Recruitment-2022-Notification-PDF.pdf या लिंकला भेट द्यावी. या पदभरती प्रक्रियेतून 160 पदांवर भरती केली जाणार आहे.

    NTRO Recruitment 2023 विषयी अधिक माहिती

    अर्ज भरण्यास सुरुवात - 31 डिसेंबर 2022

    अर्ज करण्याची अंतिम मुदत - 21 जानेवारी 2023

    (हे वाचा: घाई करा! तब्बल 4500 जागांसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी; अर्जाची उद्याची शेवटची तारीख; लगेच करा अप्लाय )

    NTRO Recruitment 2023 मध्ये एकूण किती पदं भरली जाणार आहेत?

    पदांची संख्या - 160

    NTRO Recruitment 2023 साठी पात्रता

    या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवर जाऊन अधिकृत नोटिफिकेशन वाचावं. त्यात दिलेले पात्रतेचे निकष त्यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे.

    NTRO Recruitment 2023 साठी वयोमर्यादा

    या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा 30 वर्षांची देण्यात आली आहे.

    NTRO Recruitment 2023 साठी अर्ज शुल्क

    एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांना यासाठी कोणतंही शुल्क भरणं गरजेचं नाही.

    अन्य सर्व उमेदवारांना अर्जासाठी 500 रुपये शुल्क भरणं आवश्यक आहे.

    NTRO Recruitment 2023 साठी निवड प्रक्रिया

    निवड या आधारे केली जाईल.

    स्टेज 1 (लेखी परीक्षा) – 200 मार्क्स

    स्टेज 2 (मुलाखत) – 50 मार्क्स

    या माहितीच्या आधारे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अधिक माहिती घेऊन अर्ज भरावा.

    First published:

    Tags: Job, Job alert