Home /News /career /

बंपर सरकारी नोकऱ्या, आठवी, दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी नोकरीच्या अनेक संधी, जाणून घ्या तपशील

बंपर सरकारी नोकऱ्या, आठवी, दहावी, बारावी आणि पदवीधरांसाठी नोकरीच्या अनेक संधी, जाणून घ्या तपशील

इस्रो, बिहार पोलीस आणि युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड या तीन ठिकाणी नोकरीच्या संधी सध्या उपलब्ध असून अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत तरुणांनी तयारीनिशी सर्व औपचारिकता पूर्ण कराव्यात, असं सांगण्यात आलं आहे.

    नवी दिल्ली, 8 जुलै : या वर्षी वेगवेगळ्या राज्यांत (States) आणि संस्थांमध्ये (Organizations) नोकऱ्यांसाठी अर्ज (Job applications) मागवण्यात आले असून तरुण-तरुणींसाठी मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इस्रो (ISRO), बिहार पोलीस (Bihar Police) आणि युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड (UPL) या तीन ठिकाणी नोकरीच्या संधी सध्या उपलब्ध असून अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत तरुणांनी तयारीनिशी सर्व औपचारिकता पूर्ण कराव्यात, असं सांगण्यात आलं आहे. या विभागांकडून जारी करण्यात आलेल्या सूचना बारकाईनं वाचून त्या समजून घेणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. बिहार पोलीस बिहार पोलिसांच्या वतीनं स्पोर्ट्स कोट्यातून पोलिस शिपाई आणि अंडर पोलीस निरीक्षक या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी बिहार पोलिसांची अधिकृत वेबसाईट biharpolice.bih.nic.in वर जाऊन सर्व तपशील जाणून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याच ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा असून पोलीस अवर निरीक्षकांची 21 तर कॉन्स्टेबलची 85 पदं भरली जाणार आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 वी पास ही किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. तर अवर निरीक्षक पदासाठी किमान पदवीधर असणे अनिवार्य आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 जुलैला सुरू होईल आणि ती 9 ऑगस्ट 2021 पर्यंत चालेल. इस्रोमध्ये भरती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतही काही पदं भरायची आहेत. इंजिनिअरिंगची पदवी आणि डिप्लोमा घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदासाठी संधी मिळणार आहे. Isro.gov.in या वेबसाईटवर याबाबतची सविस्तर माहिती मिळू शकेल. एकूण 43 जागा भरल्या जाणार असून 22 जुलै ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. हे वाचा -Education Loan घेण्याचा विचार करताय? मग 'ही' कागदपत्रं आहे ना? एकदा तपासून घ्या वॉचमन हवेत केरळ राज्य सहकारी संघानं वॉचमन या पदासाठी नोकरी असल्याचं जाहीर केलं असून त्यासाठी आठवी पास ही किमान पात्रता निश्चित करण्यात आली आहे. Scu.kerala.gov.in या बेवसाईटवर याबाबतचे तपशील जाणून घेता येणार आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Government, Jobs

    पुढील बातम्या