मराठी बातम्या /बातम्या /करिअर /क्या बात है! 'या' क्षेत्रातील कर्मचारी होणार मालामाल; तब्बल 60-120 टक्क्यांनी वाढणार पगार; वाचा सविस्तर

क्या बात है! 'या' क्षेत्रातील कर्मचारी होणार मालामाल; तब्बल 60-120 टक्क्यांनी वाढणार पगार; वाचा सविस्तर

कंपन्यांनी आधीच्या कर्मचाऱ्यांसोबतच नवीन कर्मचाऱ्यांनाही न्यू इयर गिफ्ट देण्याचा विचार केला आहे.

कंपन्यांनी आधीच्या कर्मचाऱ्यांसोबतच नवीन कर्मचाऱ्यांनाही न्यू इयर गिफ्ट देण्याचा विचार केला आहे.

कंपन्यांनी आधीच्या कर्मचाऱ्यांसोबतच नवीन कर्मचाऱ्यांनाही न्यू इयर गिफ्ट देण्याचा विचार केला आहे.

मुंबई, 30 डिसेंबर: गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहेत. भारतातही पहिली आणि दुसरी लाट येऊन गेली आहे. मात्र आता Omicron नावाच्या कोरोनाच्या व्हेरिएन्टनं (Omicron cases India) जगभरातील लोकांमध्ये पुन्हा दहशत निर्माण केली आहे. अशा परिस्थितीतही काही टॉप IT कंपन्यांनी (Top IT companies Jobs) कंपनीत मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्स (Freshers jobs in IT) आणि प्रोफेशनल्सची (IT professionals jobs) भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसारआता येत्या नवीन वर्षांपासून भरतीला (latest IT Recruitment) सुरुवातही होणार आहे. मात्र त्याआधी कंपन्यांनी आधीच्या कर्मचाऱ्यांसोबतच नवीन कर्मचाऱ्यांनाही न्यू इयर गिफ्ट देण्याचा विचार केला आहे.

ET च्या एका अहवालानुसार, भारतातील टेक आणि आयटी उद्योग (Career in IT Sector) पुढील वर्षी पगार किंवा काउंटर ऑफर तब्बल 60-120 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी ही सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे.

10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महावितरणमध्ये 320 जागा रिक्त

भारतीय IT सेवा क्षेत्राने नवीन वर्षासाठी नोकरीच्या योजनांना प्रोत्साहन देणं सुरू ठेवलंआहे, कारण सर्व उद्योगांमधील कंपन्या साथीच्या रोगानंतर व्यवसाय चालवण्याच्या नवीन डिजिटल पद्धतींचा अवलंब करत आहेत. 2022 मध्ये नव्या युगातील टेक टॅलेंटची मागणी आणखी वाढणार आहे आणि त्यामुळे पगारही वाढणार आहेत असं या अहवालात म्हंटलं आहे.

"कर्मचारी कामावर ठेवण्याची समस्या ही आहे की प्रत्येकजण टॅलेंटेड 5% प्रतिभावानांना नियुक्त करू इच्छितो पण बहुतेक 95% आयटी कर्मचार्‍यांना दर्जेदार प्रशिक्षण आणि स्किल्सच्या पूर्ण अभावामुळे कमी पगार मिळतो. देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये देत असलेल्या शिक्षणाचा दर्जा कालच्या नोकऱ्यांसाठीही कालबाह्य आणि निरुपयोगी आहे, उद्याच्या नोकऱ्यांसाठी तर सोडा आजही त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे आपण मागे आहोत" असं एका कंपनीच्या संचालकांनी म्हंटलं आहे.

मात्र असं असेल तरी यंदा IT क्षेत्रात प्रचंड प्रमाणात जॉब्सच्या संधी वाढणार आहेत. तसंच फ्रेशर्स आणू प्रोफेशनल्सना यामुळे फायदा होणार आहे. कंपन्यांनी आपला Attrition रेट कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Salary