मराठी बातम्या /बातम्या /करिअर /देशात भरती परीक्षांच्या घोटाळ्यांमध्ये भरडले जाताहेत होतकरू विद्यार्थी; का वाढतंय गैरप्रकारांचं प्रमाण? वाचा

देशात भरती परीक्षांच्या घोटाळ्यांमध्ये भरडले जाताहेत होतकरू विद्यार्थी; का वाढतंय गैरप्रकारांचं प्रमाण? वाचा

भरतीमध्ये असे घोटाळे होणे म्हणजे ही गंभीर बाब आहे

भरतीमध्ये असे घोटाळे होणे म्हणजे ही गंभीर बाब आहे

अचानक आताच का वाढलं प्रमाण? आणि यामध्ये होतकरू गरीब विद्यार्थ्यांचं काय? हेच मुद्दे आज आम्ही तुमच्यासमोर स्पष्ट करणार आहोत.

मुंबई, 26 जानेवारी: आपल्या देशात स्पर्धा परीक्षा किंवा भरती परीक्षा (Government exams) म्हंटलं की एक ऊर्जा तरुणांमध्ये संचारते. याचा प्रमुंख कारण म्हणजे सरकारी नोकरी (Latest Government Jobs). "एकदा सरकारी नोकरीला लागलास की संपूर्ण आयुष्य चांगलं होईल" असं वारंवार अनेक वरिष्ठांकडून सांगण्यात येतं. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पगार (Salary of Government employee), त्यांना मिळणाऱ्या इतर सुविधा, इतकंच काय तर ऐन महागाईच्या आणि कोरोनाकाळात सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढता पगार या सर्व गोष्टी आजकालच्या तरुणाईला अगदी भुरळ घालतात. अर्थात या सर्व गोष्टींमध्ये काही वाईट आहे असं अजीबात नाही. म्हणूनच देशातील लाखो विद्यार्थी दरवर्षी अनेक भरती परीक्षांसाठी (How to prepare for government Exams) अर्ज करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या भरती परीक्षांमध्ये घोटाळे (Fraud in Government exams) आणि गैरप्रकारांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण का? नक्की यामागील कारण काय? अचानक आताच का वाढलं प्रमाण? आणि यामध्ये होतकरू गरीब विद्यार्थ्यांचं काय? हेच मुद्दे आज आम्ही तुमच्यासमोर स्पष्ट करणार आहोत.

राज्यात आरोग्य विभाग भरती घोटाळा, म्हाडा यांसारख्या अनेक परीक्षांमध्ये घोटाळे आणि पेपरफुटीचे प्रकार घडल्याचं आपण गेल्या काही महिन्यांमध्ये ऐकलं असेल, वाचलंही असेल. हे प्रकरणं साधीसुधी नाहीत. सरकारी विभागातील भरतीमध्ये असे घोटाळे होणे म्हणजे ही गंभीर बाब आहे. यामध्ये काही बडे अधिकारीही अडकले आहेत. अर्थात या सगळ्याची चौकशी सुरु आहे. त्यात आता RRB NTPC च्या परीक्षेतही घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांना गेल्या तीन दिवसांपासून बिहार आणि उत्तर प्रदेशात आंदोलन सुरू केलं आहे.

Office Tips: ऑफिसमध्ये तुमचीच असेल हवा; मिटींग्समध्ये 'या' गोष्टींचं करा पालन

भरतीत गैरप्रकार असे होतात?

उदाहरणार्थ एका वर्गात पाच विद्यार्थी असतील तर ते पाचही विद्यार्थी सारख्या क्षमतेचे असतीच असं नाही. काही विद्यार्थी स्वतः मेहनत करून अभ्यास करून परीक्षा पास करत असतील तर काही विद्यार्थी कॉपी करून पास होत असतील. इतकंच नाही तर काही विद्यार्थ्यांचे थेट शिक्षकांशी संबंध असतील. मग या वर्गात जो पहिला येईल तो अर्थातच सर्वाधिक ओळखी असणारा विद्यार्थी असेल. असंच काही सध्या भरती परीक्षेत सुरु आहे. विद्यार्थ्यांनी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये क्लासेस लावले आहेत अशा विद्यार्थ्यांना काही समाजकंटक संपर्क साधून त्यांना काही पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करून देऊ अशीऑफर देतात. इथेच काही नाकर्ते विद्यार्थी भुलतात आणि सरकारी नोकरीच्या आशेपोटी अशांना लाखो रुपये देतात. विशेष म्हणजे हे रॅकेट विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांपासून तर अगदी अशिक्षित लोकांपर्यंत सर्वांद्वारे चालवण्यात येऊ शकतं.

यामागील नक्की कारण काय?

कोरोनाकाळात अनेक तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. काही हातावर पोट असलेले तरुण बेरोजगार झाले. अशात यातील काही तरुण हे पुन्हा सरकारी नोकरीकडे वळले. तर गेली कित्येक वर्ष जीवाचं रान करून मेहनत करणारे विद्यार्थीही परीक्षेला बसले. काही गरजू तर काही शॉर्टकट मारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे मागून त्यांना भुरळ घालण्याचं काम सुरु झालं. आता आपल्यालाही नोकरी लागणार या आशेनं अनेकांनी पैसेहे भरले. गरीब आणिगरजू विद्यार्थ्यांना नोकरीचं आमिष दाखवून पैसे बळकवणे हाच यामागचा उद्दे हेच यामागचं कारण.

भरडले जाताहेत होतकरू विद्यार्थी

या सर्व पेपर फुटीच्या प्रकरणांमुळे किंवा घोटाळ्यांमुळे नाईलाजास्तव भरती परीक्षा रद्द करण्याची वेळ येत आहे.तसंच काही भरती परीक्षा या पुढे ढकलल्या जात आहेत. यामध्ये मात्र गरीब आणि हॉकृ विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. असे विद्यार्थी आई-वडिलांपासून दूर लहान-मोठ्या खेड्यातून केव्हा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरात येतात, मात्र अशा घोटाळ्यांमुळे त्यांना मेहनत करूनही नोकरी मिळू शकत नाही. अशा होतकरू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रचंड नुकसान होत आहे.

Career Tips: TV रिपोर्टर होण्याचं स्वप्न बघताय? इथे मिळेल पात्रतेविषयी माहिती

आंदोलनाचा मार्ग कितपत योग्य?

सध्या देशामध्ये RRB NTPC च्या परीक्षेतही घोटाळा झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. अनेक रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्टेशन्सची तोडफोड करण्यात अली आहे. मात्र हा आंदोलनाचा मार्ग योग्य नाही. घोटाळा झाला असेल तर विद्यार्थ्यांनी न्यायिक लढाई लढावी आणि स्वतःची बाजू मांडावी असं काही तज्ज्ञांचं मत आहे. सरकारनंही अशा नाजूक विषयांमध्ये खंबीर भूमिका घेत लवकरात लवकर चौकशी करावी आणि खरंच घोटाळा झाला असल्यास त्वरित योग्य तो निर्णय घ्यावा. तसंच यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्यावी असंही तज्ज्ञांचं मत आहे.

First published:
top videos

    Tags: Career, Exam, Government, Online fraud, जॉब