मुंबई, 13 जून : नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स अर्थात राष्ट्रीय आदिवासी विद्यार्थी शिक्षण समितीने एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार समितीने ईएमआरएस रिक्रुटमेंट 2023 नियम आणि अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेतून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं भरण्यात येणार आहेत. या पदांवर पात्र उमेदवारांची नियुक्ती प्रोबेशन पीरियडसाठी केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसंदर्भात काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्सने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदांसाठी ईएमआरएस भरती 2023 नियम आणि अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेतून 38,480 पदं एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये भरली जाणार आहेत. या पदांच्या अनुषंगाने शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक पदासाठीचे निकष आणि शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. इच्छुक उमेदवार संबंधित पदासाठीची शैक्षणिक पात्रता आणि अन्य तपशील अधिसूचनेत पाहू शकतात. अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेतून प्राचार्यांची 740, उप प्राचार्य 740, पीजीटी 8140, पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (कम्प्युटर सायन्स) 740, टीजीटी 8880, कला शिक्षक 740, संगीत शिक्षक 740, शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांची 1480, ग्रंथपाल 740, स्टाफ नर्स 740, होस्टेल वॉर्डन 1480, अकाउंटंट 740, केटरिंग असिस्टंट 740, चौकीदार 1480, स्वयंपाकी 740, समुपदेशक 740, ड्रायव्हर 740, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर 740, माळीकाम 740, ज्युनिअर सेक्रेटरिएट असिस्टंट 1480, लॅब अटेडंट 740, मेस हेल्पर 1480, सीनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट 740 आणि स्वीपरची 2220 पदं भरली जाणार आहेत. या प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता निकष वेगवेगळे आहेत. ईएमआरसीच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक उमेदवाराची थेट भरतीतून सुरुवातील प्रोबेशनवर नियुक्ती केली जाणार आहे. प्रोबेशनचा कालावधी नियुक्तीच्या तारखेपासून दोन वर्षे असेल. हा कालावधी आणखी दोन वर्षांनी वाढू शकतो. एकदा परीक्षा कालावधी संपल्यानंतर नियुक्त अधिकारी महिला किंवा पुरुष उमेदवाराच्या कामकाजाबाबत समाधानी असेल तर तो किंवा ती नियुक्तीच्या पुष्टीकरणासाठी पात्र असेल. ही पदं थेट भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. या पद भरतीशी संबंधित अधिक तपशीलासाठी उमेदवारांनी ईएमआरएसच्या emrs.tribal.gov.in. या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घ्यावी. इच्छुक उमेदवारांनी संबंधित पदासाठी अर्ज करण्यापूर्वी ईएमआरएसची अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.