Home /News /career /

IT Jobs: BCA आणि BSc पदवीधरांनो, 'या' मोठ्या IT कंपनीत तुमच्यासाठी बंपर भरती; उद्याची शेवटची तारीख

IT Jobs: BCA आणि BSc पदवीधरांनो, 'या' मोठ्या IT कंपनीत तुमच्यासाठी बंपर भरती; उद्याची शेवटची तारीख

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

कोणत्या पद्धतीनं या भरतीसाठी अप्लाय करणार? याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 05 जानेवारी: जगभरातील आणि देशातील नामांकित IT कंपनी Cognizant इथे लवकरच काही उमेदवारांसाठी मोठी भरती (Cognizant jobs in India) होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Cognizant jobs for freshers) जारी करण्यात आली आहे. BCA (BCA jobs in IT) आणि BSc पर्यँतशिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. 2020 आणि 2021 या वर्षी पास आउट झालेल्या उमेदवारांसाठी ही भरती (Freshers jobs in IT sector) घेणार येणार आहे. मात्र या भरतीसाठी नक्की पात्रता (Eligibility for Cognizant jobs) काय असणार? कोणत्या पद्धतीनं या भरतीसाठी अप्लाय करणार? याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. हे उमेदवार असतील पात्र   BCA, B.Sc IT/संगणक विज्ञान/संगणक तंत्रज्ञान/गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/सांख्यिकी मधील विद्यार्थी, ज्यांनी 2020 आणि 2021 मध्ये पदवी प्राप्त केली आहे तेच या भूमिकेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पदव्युत्तर विद्यार्थी या भूमिकेसाठी पात्र नाहीत. उमेदवारांकडे वर्ग 10, 12, डिप्लोमा आणि अंडरग्रेजुएटमध्ये किमान 60% चा सातत्यपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. टीप: सर्व विषय विचारात घेतले जातील. उमेदवारांच्या चालू शिक्षणात कोणतीही गॅप नसावी. ज्यां उमेदवारांच्या शिक्षणात 2 वर्षांपेक्षा जास्त अंतर असलेले उमेदवार पात्र नाहीत. ही संधी फक्त भारतीय नागरिक, भारताचे परदेशी नागरिकत्व (OCI) आणि दुहेरी नागरिकत्व धारकांसाठी खुली आहे. उमेदवारांना भारतातील कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी, कोणत्याही शिफ्ट/डोमेनमध्ये काम करण्यासाठी फ्लेक्सिबल असणं आवश्यक आहे. सध्या कंपनीत काम करणारे कर्मचारी वरील प्रोफाइलसाठी अर्ज करू शकत नाहीत. JOB ALERT: मुंबईच्या 'या' शिप बिल्डिंग कंपनीत तब्बल 86 जागांसाठी Vacancy अशी असेल जॉब प्रोफाइल सिंपल लेव्हल कोडिंग करणे आणि कोड डेव्हलप करणे. डेटाबेसचे चार्ट्स बनवणे टेबलमधील संबंधांचे वर्णन करा आणि डेटाबेसमधून डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी सोप्या क्वेरी बनवणे. चाचणी प्रकरणे/स्क्रिप्ट/डेटा तयार करा आणि मॅन्युअल/स्वयंचलित चाचण्या करणे. इतका मिळेल पगार या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 2,52,000 रुपये प्रतिवर्ष इतका पगार मिळणार आहे. यासोबतच इतरही सुविधा मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख या पदभरतीसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 6 जानेवारी 2022 ही शेवटची तारीख असणार आहे. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अप्लाय करायचं आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या