मुंबई, 26 जुलै : इयत्ता 10 वीचे निकाल काही दिवसांपूर्वी लागले होते, परंतु 11 ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया (Admission Process) कधी सुरू होईल, याची वाट विद्यार्थी (Students) आणि पालक (Parents) पाहत होते. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात 11वीचे ऑनलाइन अॅडमिशन (Online Admission) आजपासून (26 जुलै 22) सुरू होत आहे. राज्यात ज्युनियर कॉलेजच्या पहिल्या वर्षासाठी (First year of junior College) यंदा कोटा (Quota) आणि जनरल जागांची (General Seats) अॅडमिशन प्रक्रिया सोबत सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत कोटा अॅडमिशन्स म्हणजे इनहाउस मॅनेजमेंटच्या जागा, विविध आरक्षित कोट्यातील जागा आणि अल्पसंख्य कोट्यातील जागांची अॅडमिशन्स आधी होत असतं. हा यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाचा बदल आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’नं या संदर्भात वृत्त दिलंय. कशी आहे प्रक्रिया? केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) विद्यार्थ्यांची नोंदणी 30 मेपासून (11thadmission.org. in) सुरू झाली असली तरी, राज्य बोर्डाची यंत्रणा ICSE आणि CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागण्याची वाट पाहत होती. शुक्रवारपासून विद्यार्थ्यांनी कॉलेजचे पसंतीक्रम म्हणजेच ऑप्शन फॉर्म (Option Form) भरण्यास सुरुवात केली. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यासाठी आणि लॉक करण्यासाठी 27 जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. या वर्षी कोट्यातील इनहाउस (inhouse), मॅनेजमेंट (Management) आणि अल्पसंख्य (Minority) आरक्षित जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि जनरल कॅटेगरीमध्ये (general category) अर्ज करणारे विद्यार्थी एकत्र अर्ज करणार आहेत. याबाबत एका मायनॉरिटी कॉलेजचे प्रिन्सिपल (Principal of a Minority College) म्हणाले, “गेल्या वर्षीपर्यंत महाविद्यालयांना कॅप (CAP) सुरू होण्यापूर्वी कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी 10 दिवस मिळत होते. पण या वेळी दोन्ही गटांतील प्रवेश एकावेळीच होणार असल्याने प्रशासकीय कर्मचार्यांवर (Administrative Staff) याचा भार पडू शकतो, पण आम्ही त्यांना अॅडमिशन पूर्ण करण्यास मदत करू. या वर्षी कोट्यातील 1.4 लाख जागांसह 3.7 लाखांहून अधिक जागा अॅडमिशनसाठी उपलब्ध आहेत.” तुम्हालाही मेडिकल क्षेत्रात करिअर करायचंय? मग ‘हे’ UG कोर्सेस आहेत बेस्ट; बघा डिटेल्स पुढच्या फेरीचं वेळापत्रक जनरल कॅटेगरीच्या अॅडमिशनचा दुसरा राउंड (General Category Admission Second Round) 7 ते 17 ऑगस्टदरम्यान होणं अपेक्षित आहे. त्यानंतर तिसरा राउंड आणि स्पेशल अॅडमिशन राउंड (Special Admission Round) अपेक्षित आहे. प्रवेशांची मुदत सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने शैक्षणिक वर्षही (Academic Year) त्याच वेळी सुरू होण्याची आशा कॉलेजांना आहे. अखेर 11 वीच्या अॅडमिशनची प्रक्रिया सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या कॉलेजेसमध्ये अॅडमिशन घेण्यास ऑप्शन फॉर्म भरत आहेत. एकंदरीत या अॅडमिशन प्रक्रियेत पूर्ण ऑगस्ट महिना जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कॉलेजेस सुरू व्हायला सप्टेंबर महिना उजाडेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







