मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

शाळा ग्रामपंचायतीकडे, आठवीपर्यंतच्या परीक्षा सुरू, राज्यात येणारा केरळ पॅटर्न कसा असेल?

शाळा ग्रामपंचायतीकडे, आठवीपर्यंतच्या परीक्षा सुरू, राज्यात येणारा केरळ पॅटर्न कसा असेल?

राज्यात येणारा केरळ पॅटर्न कसा असेल?

राज्यात येणारा केरळ पॅटर्न कसा असेल?

महाराष्ट्रात आता केरळ राज्याचं शिक्षण मॉडेल राबवलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 22 नोव्हेंबर : नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार आता शिक्षण क्षेत्रात बदल करण्याची विचार करत आहे. राज्यात शालेय शिक्षणात आता केरळ राज्य मॉडेल आधारीत शिक्षण पद्धती राबवण्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. यानुसार आठवीपर्यंत बंद करण्यात आलेल्या सराव परीक्षा पुन्हा एकदा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. यापूर्वी तत्कालीन भाजप सरकारने आठवीपर्यंत कोणालाही नापास न करण्याचं धोरण राबवलं होतं.

शाळा आता ग्रामपंचायतीकडे दिल्या जाणार : केसरकर

देशभरात शिक्षण क्षेत्रात ज्या राज्यांनी प्रगती केली आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षण विभागाने दौरे केले आहेत. त्यात केरळने अनेक प्रयोग शिक्षण विभागात केल्याची माहिती मिळाली. शिक्षण क्षेत्रात केरळने अनेक उपक्रम राबवले आहेत. यातील जे मॉडेल यशस्वी झाले आहेत, ते पुढे नेण्यात येणार असल्याचं केसरकर म्हणाले. केरळ आणि महाराष्ट्र अशी तुलना करता येणार नाही. केरळसोबत पंजाब आणि राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत. केरळमध्ये शाळा ही ग्रामपंचायतीकडे दिल्या आहेत. विद्यार्थीकेंद्री सुधारणा आम्ही राज्यात करणार असल्याचं मंत्री केसरकर यांनी सांगितलं.

आठवीपर्यंत कोणालाही नापास करणार नाही : मंत्री केसरकर

पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी लहान असतात, त्यामुळे त्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात पाठवले जणार आहे. तिसरीपासून पुढील इयत्तेसाठी परीक्षा घेतल्या जातील. परीक्षा जरी घेतल्या जाणार असल्या तरी आठवीपर्यंत कोणालाही नापास केलं जाणार नसल्याचं केसरकर म्हणाले.

वाचा - Board Exams 2023: यंदा बोर्डाची परीक्षा देणार आहात? मग 'या' चुका करूच नका; अन्यथा...

दप्तराचं ओझं कमी करणार..

आम्ही पुस्तकाला वह्याची पान जोडणार आहोत. पुढील वर्षीपासून अशी पुस्तकं आणि त्याला वह्यांची पान जोडली जातील. प्रत्येक पुस्तक तीन भागात विभागले जाईल, म्हणजे तीन महिन्याला पुस्तक बदलावं लागेल. याच विभागलेल्या पुस्तकाला वह्यांची पाने असतील. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा झालेला अभ्यास त्याच वह्यांच्या पानावर लिहतील. एकंदरीत दप्तराचं ओझं आता कमी होणार आहे.

पुढील शिक्षण मातृभाषेत : केसरकर

मराठी विभाग जागतिक मराठी परिषदेचे आयोजन करणार असून मुंबईत ही परिषद होणार आहे. यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाची मदत घेतली जाणार आहे. जिथे जिथे मराठी बोलली जाते, त्या सगळ्या राज्यातील लोकांना एकत्र आणण्याचा संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न असेल. मराठी पंधरवडा असणार तेव्हा मुंबईत 'मुंबईत मराठी बोला' अशी 15 दिवसाची मोहीम राबविणार आहोत. इंग्रजी शाळांकडील गर्दी लवकरच थांबेल, कारण पुढंच शिक्षण हे मातृ भाषेत आपण करणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

First published:

Tags: Education, Education department