जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / क्या बात है! 'हे' भन्नाट पार्ट टाइम जॉब्स करून तुम्हीही कमवू शकता पैसे; कसे? इथे मिळेल संपूर्ण माहिती

क्या बात है! 'हे' भन्नाट पार्ट टाइम जॉब्स करून तुम्हीही कमवू शकता पैसे; कसे? इथे मिळेल संपूर्ण माहिती

काही प्रोफेशनल सेकंड इन्कम सोर्स

काही प्रोफेशनल सेकंड इन्कम सोर्स

आज आम्ही तुम्हाला टाइम जॉब्सच्या (Unique Part Time Jobs) काही भन्नाट पद्धती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही भरघोस पैसे कमावू शकाल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 मार्च: तरुण वयातच पैसे कमवणं (Earn money tips) आता सध्याच्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे बारावीनंतरच काही विद्यार्थी पार्ट टाइम जॉब्सचा (Part Time Jobs) आधार घेतात आणि आपलं शिक्षण स्वतःच्या पैशांवर पूर्ण करतात. कुटुंबावर आर्थिक भार पडू नये म्हणून ही पावलं उचलतात. तसंच फार कमी वयात काही जण तर सोशल मीडियाच्या (money earning tips from social media) माध्यमातून किंवा इतर माध्यमातून पैसे कमावण्यास सुरुवात करतात. काही प्रोफेशनल्सही सेकंड इन्कम सोर्स (Second Income Source) म्हणून परत टाइम जॉब्स करून किंवा काही ऑनलाईन काही टास्क पूर्ण करून पैसे (How to earn Money by Part Time Jobs) कमावतात. जर तुम्हालाही अशी इच्छा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला पार्ट टाइम जॉब्सच्या (Unique Part Time Jobs) काही भन्नाट पद्धती सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही भरघोस पैसे कमावू शकाल. चला तर मग जाणून घेऊया. ऑनलाईन सर्व्हे करून कमवा पैसे आजोळच्या काळात लोकांना कुठली गोष्ट आवडत आहे कुठली नाही हे बघण्यासाठी ऑनलाईन सर्व्हेची मदत घेतली जाते. या ऑनलाइन पैसे कमावण्याच्या कामाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही नोकरी करण्यासाठी तुम्हाला कोणतेही कौशल्य शिकण्याची आवश्यकता नाही. या माध्यमातून तुम्ही तुमचं शॉर्ट इन्कम सेट करू शकता. काही वेबसाईट्स वर ऑनलाईन सर्व्हे पूर्ण करून तुम्ही महिन्याला पाच ते सात हजार रुपये कमवू शकता. तसंच या माध्यमातून स्वतःचा खर्च स्वतःच पूर्ण करू शकता. आता मतभेद विसरा; ऑफिस सुरु झाल्यानंतर असे ठेवा सहकाऱ्यांशी चांगले संबंध ऑनलाईन Quiz खेळून पैसे ऑनलाईनquiz खेळण्याची क्रेझ प्रचंड वाढत चालली आहे. अनेकजण आपल्या स्मार्टफोन्स वर ऑनलाईन जनरल नॉलेज खेळतात. पण हेच गेम खेळणं तुमच्या इन्कमचं साधन बनू शकतं. अभ्यासासोबत अर्धवेळ नोकरी करून पैसे कमवायचे असतील तर ऑनलाइन क्विझ हा एक उत्तम मार्ग आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही अर्धवेळ उत्पन्न मिळवू शकता आणि तुमचे सामान्य ज्ञान वापरून प्रश्नांची उत्तरे देऊन हजारो किंवा लाखो रुपये कमवू शकता. LOCO सारख्या अॅपच्या मदतीने तुम्ही दररोज कोणताही गेम खेळून पैसे कमवू शकता Amazon Flex वर करू शकता काम Amazon Flex ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुम्ही Amazon साठी डिलिव्हरीचे काम करू शकता. आजकाल ऑनलाईन ऑर्डरची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे यासाठी कंपनीला डिलेव्हरी करणाऱ्या माणसांची गरज पडते आहे. तुम्हीही हा पार्ट टाइम जॉब करू शकता. Amazon Flex वरून पैसे कमवण्यासाठी आधी तुम्हाला Play Store वर जाऊन Amazon Flex अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर नवीन खाते तयार केल्यानंतर तुम्हाला तुमचा एरिया निवडावा लागेल. यानंतर काही प्रोसेस पूर्ण करून तुम्हाला पैसे कमवता येतील. महिन्याला तुम्हाला हे काम करून 15 हजार रुपये कमवता येतील. घरी आरामात झोपून कार्टून शो पाहाण्याची नोकरी; लाखोच्या पॅकेजसह डोनटही फ्री ऑनलाईन जाहिराती बघून कमवा पैसे जर तुम्हाला पार्ट टाइम जॉबमध्ये जास्त वेळ घालवायचा नसेल, तर तुम्ही घरी बसल्या ऑनलाइन साइट्सवर जाहिराती पाहून पैसे कमवू शकता. काही वेबसाइट्स वापरून ऑनलाइन जाहिराती पाहून पैसे कमवू शकता आणि अर्धवेळ नोकरीतून पैसे कमवण्यासाठी ही पद्धत उत्तम आहे. कारण इथे तुम्हाला अजिबात कष्ट करण्याची गरज नाही, तुम्ही फक्त पेड टू क्लिक किंवा पीटीसी वेबसाइटवर जाऊन जाहिराती बघा आणि पैसे कमवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात