मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

एकाच वेळी घ्या दोन-दोन डिग्री; कसे करायचे एकत्र दोन कोर्सेस पाहा

एकाच वेळी घ्या दोन-दोन डिग्री; कसे करायचे एकत्र दोन कोर्सेस पाहा

एकाच वेळी दोन डिग्री कोर्सेस करा.

एकाच वेळी दोन डिग्री कोर्सेस करा.

पूर्वी एका कोर्सला प्रवेश घेतल्यावर त्याचसोबत दुसरा कोर्स करता येत नव्हता; मात्र नव्या धोरणानुसार आता ते शक्य होणार आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होणार आहेत. 2020 मध्ये हे धोरण जाहीर झालं; मात्र कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात बरीच उलथापलथ झाली होती. आता शिक्षणाची गाडी रुळावर येत असताना शैक्षणिक धोरणातल्या निर्णयांची अंमलबजावणीही होते आहे. पूर्वी एका कोर्सला प्रवेश घेतल्यावर त्याचसोबत दुसरा कोर्स करता येत नव्हता; मात्र नव्या धोरणानुसार आता ते शक्य (How One Can Do Dual Courses At A Time) होणार आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार (New Education Policy) विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन कोर्सेसना प्रवेश घेता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीनं (UGC) त्याला नुकतीच मान्यता दिली आहे; मात्र अजूनही सर्व विद्यार्थ्यांना याची माहिती झालेली नाही. एकाच वेळी दोन कोर्सेसना प्रवेश कसा घेता येऊ शकेल, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ.

कोणताही विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार दोन वेगवेगळ्या कोर्सेसना प्रवेश घेऊन अभ्यास करू शकतो, असं अलीकडेच यूजीसीने सांगितलं. इतकंच नाही, तर हे कोर्सेस पदवीचेही असू शकतात किंवा एक पदवी अभ्यासक्रम व एक पदविका अभ्यासक्रम अशी निवडही विद्यार्थी करू शकतात.

हे वाचा - दैनंदिन जीवनातील 'या' वाईट सवयी कायमचं संपवू शकतात तुमचं करिअर; आताच करा कंट्रोल; अन्यथा....

कोर्सची निवड करताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. अनेक विद्यार्थ्यांना बीएस्सी, बीकॉम करतानाच इतिहास, इकॉनॉमी, भाषा या विषयांमध्ये रस असतो. असे विद्यार्थी आता हे दोन्ही कोर्सेस एकत्र करू शकतात. ऑफलाइन पद्धतीने अभ्यास करण्यासाठी दोन्ही कोर्सेसच्या वेळा वेगवेगळ्या असाव्या लागतील. नाही तर एक ऑफलाइन व एक ऑनलाइन या पद्धतीनं अभ्यास करता येईल. याबाबतची माहिती कोर्सला प्रवेश घेताना द्यावी लागेल. याव्यतिरिक्त एका कोर्सचा अभ्यास ऑफलाइन व दुसऱ्या कोर्सचा अभ्यास डिस्टन्स लर्निंगच्या पद्धतीनंही करता येईल.

ज्या संस्थांना यूजीसी किंवा सरकारची मान्यता असेल, त्याच संस्थांमधून अशा प्रकारे एकाच वेळी दोन कोर्सेस करता येऊ शकतील. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. दोन पदव्या एकत्र मिळवण्यासाठी कोणत्याही विशेष प्रावीण्याची गरज नाही. पदवी शिक्षणासाठी बारावी पास ही अट व पदव्युत्तर शिक्षणासाठी पदवी पूर्ण असणं गरजेचं आहे.

हे वाचा - खूप प्रयत्न करूनही जॉब मिळत नाहीये? मग तुम्ही Cover Letter मध्ये या चुका तर करत नाहीत ना? आताच करा चेंज

नव्या शैक्षणिक धोरणामुळे आता विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी एक कोर्स पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार नाही. एकाच वेळी दोन कोर्स केल्यानं विद्यार्थ्यांचा वेळही वाया जाणार नाही. अर्थात ज्या विद्यार्थ्यांची दोन्ही अभ्यासक्रम पेलण्याची क्षमता असेल, त्यांनाच त्याचा फायदा होईल. ऑनलाइन, ऑफलाइन किंवा डिस्टन्स लर्निंग अशा तिन्हीपैकी कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेता येऊ शकेल.

First published:

Tags: Career, Education