Home /News /career /

विद्यार्थ्यांनो, 10वी नंतर बारावी की डिप्लोमा? नक्की कोणता पर्याय आहे उत्तम? जाणून घ्या सविस्तर

विद्यार्थ्यांनो, 10वी नंतर बारावी की डिप्लोमा? नक्की कोणता पर्याय आहे उत्तम? जाणून घ्या सविस्तर

यापैकी पुढील शिक्षणाच्या दृष्टीनं चांगला पर्याय कोणता याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यातील चांगल्या पर्यायांबाबत सांगणार आहोत.

  मुंबई, 25 मे: महाराष्ट्र राज्य दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2022) काही दिवसात जाहीर होणार आहे. मात्र यंदा परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्या असल्यामुळे लवकरच अकरावीसाठी आणि डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहेत.  (Diploma admissions 2022) रजिस्ट्रेशन सुरु करण्यात येणार आहेत. आता विद्यार्थ्यांसमोर प्रवेशासाठीची मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा विद्यार्थी पॉलिटेक्निक की बारावी (Engineering diploma or 12th) यासंदर्भात संभ्रमात असतात. यापैकी पुढील शिक्षणाच्या दृष्टीनं चांगला पर्याय कोणता याबाबत निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यातील चांगल्या पर्यायांबाबत सांगणार आहोत. इंजिनीरिंग डिप्लोमा / पॉलीटेक्नीक दहावीनंतर थेट इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश मिळतो. हा डिप्लोमा तीन वर्षांचा असतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जुनिअर इंजिनीअरचा डिप्लोमा मिळतो. विशेष म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअर व्हायचा असेल तर तुमच्या पुढील शिक्षणासाठी पॉलिटेक्निक हा उत्तम पर्याय असतो. यात अनेक ब्रान्चमध्ये तुम्हाला शिक्षण घेता येतं. इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, सिव्हिल, कम्युटर अशा अनेक ब्रांचमध्ये शिक्षण घेता येतं. इंजिनिअरिंगचे बरेचशे मुद्दे डिप्लोमा करताना समजतात आणि त्यामुळे पुढे अडचण येत नाही. प्रॅक्टिकल ज्ञानसाठीही डिप्लोमा हा उत्तम पर्याय आहे. सावधान! ऑनलाईन जॉब शोधताना 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा निर्माण होईल धोका डिप्लोमाला प[रावेसे घेतल्यानंतर जर इतर कोणत्या शाखेत म्हणजे कॉमर्स, कला क्षेत्रात जाण्याची तुमची इच्छा झाली तर ते शक्य होत नाही. यासाठ बारावी असणं महत्त्वाचं असतं. डिप्लोमानंतर डिग्रीसाठी इंजिनिअरिंगशिवाय दुसरा पर्याय नसतो. बरेच विद्यार्थी डिप्लोमानंतर जॉबही करतात. अशा विद्यार्थ्यांना सुपरवायजर किंवा जुनिअर इंजिनिअर म्हणून जॉब मिळतो. बारावीचं शिक्षण दहावीनंतर बरेच विद्यार्थी अकरावी आणि बारावी करतात. यामध्ये विद्यार्थ्यांना अकरावीची परीक्षा कॉलेजकडूनच असते मात्र बारावीमध्ये बोर्डाची परीक्षा असते. ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्स, आर्ट्स या शाखांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना बारावीशिवाय दुसरा पर्याय नसतो. तसंच अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी बारावीनंतर JEE ची परीक्षा देतात. ज्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर नक्की कोणत्या क्षेत्रात डिग्री घ्यायची आहे हे माहिती नसतं त्यांना बारावीला प्रवेश घेता येऊ शकतो. बारावीमध्ये विद्यार्थ्यांना गणिताचं ज्ञान मिळतं. तसंच बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेला वेळही मिळतो. तुम्हालाही मोठ्या कंपनीत भरघोस पगाराचा जॉब हवाय? मग अशा पद्धतीनं मिळवा नोकरी
  डिप्लोमाप्रमाणे बारावीनंतर लगेच जॉब करता येत नाहीत. सरकारी नोकरीसाठी बारावीनंतर पर्याय असतो. मात्र शिक्षणाच्या बाबतीतील अनेक मार्ग बारावीनंतर मोकळे होतात. या सर्व गोष्टींना लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Education, Exam result

  पुढील बातम्या