मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

DevOps ते AI इंजिनिअर्स 'या' आहेत सध्याच्या टॉप ट्रेंडिंग नोकऱ्या; लाखोंमध्ये मिळते सॅलरी

DevOps ते AI इंजिनिअर्स 'या' आहेत सध्याच्या टॉप ट्रेंडिंग नोकऱ्या; लाखोंमध्ये मिळते सॅलरी

सध्याच्या टॉप ट्रेंडिंग नोकऱ्या

सध्याच्या टॉप ट्रेंडिंग नोकऱ्या

काही पदं अशी आहेत, की त्या पदांवर काम करणाऱ्या लोकांना लाखो रुपये वेतन मिळतं. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनीअर, फुलस्टॅक डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदांचा समावेश आहे.

मुंबई, 13 जुलै:   शिक्षणानंतर (Education) चांगल्या पगाराची नोकरी (Jobs) मिळावी, असं प्रत्येक युवकाचं स्वप्न असतं. देशात 20 ते 25 वर्षं वयोगटातल्या युवकांची संख्या जास्त आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकरीच्या संधी वेगानं वाढत आहेत. त्याचप्रमाणे नव्याने पदंही निर्माण होत आहेत. यात काही पदं अशी आहेत, की त्या पदांवर काम करणाऱ्या लोकांना लाखो रुपये वेतन मिळतं. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनीअर, फुलस्टॅक डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनीअर या पदांचा समावेश आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सध्याच्या काळात चांगल्या पगाराच्या अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. योग्य शिक्षण आणि कौशल्य असणाऱ्या युवकांना या नोकऱ्या अगदी सहज मिळू शकतात. डेव्हऑप्स इंजिनीअर (DevOps Engineer) हे पद टेक्नोलॉजी क्षेत्रातलं सर्वाधिक वेतनाचं पद समजलं जातं. डेव्हऑप्स इंजिनीअर ऑपरेशन टीमचा सदस्य असू शकतो. तो अ‍ॅप्लिकेशन डेव्हलप करतो किंवा डेव्हलमेंट टीमचा सदस्य असू शकतो, जो डिप्लॉयमेंट (Deployment) आणि नेटवर्क ऑपरेशनमध्ये (Network Operation) सहभागी होतो. डेव्हऑप्स इंजिनीअर म्हणून काम करण्यासाठी स्क्रिप्टिंग (Scripting) आणि कोडिंगचं (Coding) ज्ञान आवश्यक असतं. डेव्हऑप्स इंजिनीअरला सर्वसाधारणपणे 75 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत वेतन मिळतं.

ITI पास उमेदवारांसाठी जॉबची सुवर्णसंधी; या साखर कारखान्यात 71 जागांसाठी Vacancy

जगभरात सध्या 2.3 कोटींपेक्षा अधिक डेव्हलपर्स आहेत. 2023 पर्यंत ही संख्या 2.7 कोटींपेक्षा जास्त असेल. आयटी सेक्टरमध्ये ही नोकरी सर्वाधिक पगार असलेली समजली जाते. फुल स्टॅक डेव्हलपर (Full Stack Developer) असलेल्या व्यक्तीला फ्रंट एंड आणि बॅक एंड प्रोग्रामिंगची (Programming) सखोल माहिती असते. तसंच या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला डेव्हलपमेंटच्या सर्व गोष्टींची माहिती असते. यात कन्सेप्टपासून फायनल प्रॉडक्टपर्यंतच्या सर्व गोष्टी समाविष्ट असतात. सर्वसाधारणपणे फुल स्टॅक डेव्हलपरचं वार्षिक वेतन 84 लाख रुपये असतं.

एखाद्या कंपनीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) अर्थात एआय प्रोजेक्ट डेव्हलप, मॅनेज आणि सुपरवाइज करण्याचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्किटेक्टचं असतं. एआय आर्किटेक्टला (AI Architect) स्टॅटिक्स आणि गणिताची उत्तम पार्श्वभूमी असणं आवश्यक आहे. याशिवाय त्याच्याकडे उत्तम प्रोग्रामिंग क्षमता हवी. तसंच पायथॉन (Python), आर (R) आणि टॉर्चसारख्या (Torch) प्रोग्रामिंग लँग्वेजचं ज्ञान असणं आवश्यक आहे. एआय आर्किटेक्टला वार्षिक सुमारे 87 लाख रुपयांपर्यंत वेतन मिळतं.

Indian Army मध्ये भरती व्हायचंय ना? मग द्या NDA परीक्षा; इथे मिळेल A-Z माहिती

सॉफ्टवेअर इंजिनीअर (Software engineer) म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर प्रोग्राम डिझाइन किंवा त्यासंबंधीचं तांत्रिक ज्ञान असणं गरजेचं असतं. ब्लॉकचेन सॉफ्टवेअर प्रोग्राम इंजिनीअर्सना सर्वसामान्यपणे कॉन्ट्रॅक्ट किंवा बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. या क्षेत्रात काम करण्यासाठी संबंधित व्यक्तीला सॉलिडिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी आणि डेटाबेस मॅनेजमेंट याविषयीचं ज्ञान गरजेचं असतं. या सेक्टरचा सातत्यानं विस्तारदेखील होत आहे. भारतात सॉफ्टवेअर इंजिनीअरला वर्षाला सरासरी 5 लाख ते 6 लाख रुपये पगार मिळतो.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams