मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जॉब मार्केटमध्ये मंदी, तरी Top इंजिनीअर्सकडून नव्या Offers ना केराची टोपली; ऑफर्स स्वीकारण्याचं प्रमाण कमी

जॉब मार्केटमध्ये मंदी, तरी Top इंजिनीअर्सकडून नव्या Offers ना केराची टोपली; ऑफर्स स्वीकारण्याचं प्रमाण कमी

आर्थिक स्थिती मंदावलेली असल्याने स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीचं प्रमाणही खूप कमी आहे. त्यामुळे साहजिकच नव्या नोकऱ्यांचं प्रमाणही कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत अद्याप कमीच आहे.

नवी दिल्ली, 10 जून: कोरोना कालखंडात अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आलं. कित्येक स्टार्टअप्स बंद पडल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. शिवाय आर्थिक स्थिती मंदावलेली असल्याने स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीचं प्रमाणही खूप कमी आहे. त्यामुळे साहजिकच नव्या नोकऱ्यांचं प्रमाणही कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत अद्याप कमीच आहे. असं असलं तरीही कंपन्यांकडून आलेल्या नोकरीच्या ऑफर्स उच्चशिक्षित इंजिनीअर्सकडून स्वीकारल्या (Job Offers) जाण्याचं प्रमाण खूप कमी असल्याचं आढळून आलं आहे. 'इकॉनॉमिक टाइम्स'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. (Full-Stack Engineers) फुल-स्टॅक इंजिनीअर्स, डेटा इंजिनीअर्स, फ्रंट-एंड इंजिनीअर्स, SRE/DevOps, डेटा सायंटिस्ट्स आणि बॅकएंड इंजिनीअर्स आदी कौशल्यं असलेल्या उमेदवारांकडून नोकरीच्या ऑफर्स (Job Offers) स्वीकारल्या जाण्याचं प्रमाण केवळ 50 टक्के एवढंच आहे. प्लेसमेंट कन्सल्टंट्सनी दिलेल्या माहितीनुसार, दोनपैकी एक उमेदवार त्याला आलेल्या ऑफरला केराची टोपली दाखवत असल्याचं दिसून आलं आहे. नुपूर शर्माविरोधात जामा मशिदीबाहेर निदर्शने, आंदोलकांकडून अटकेची मागणी Xphenoचे सहसंस्थापक अनिल इथॉनुर यांनी सांगितलं, 'ऑफर्स स्वीकारल्या जाण्याचं प्रमाण कोरोनापूर्व काळाइतकं अद्याप झालेलं नाही. ते गाठण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल. त्यामुळे अधिकाधिक ऑफर्स तुलनेने कमी टॅलेटेंड उमेदवारांकडून स्वीकारल्या जात आहेत.' फुल स्टॅक इंजिनीअर्स उच्च पातळीवरची सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स डिझाइन करतात. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात या इंजिनीअर्सकडून नोकरीच्या ऑफर्स स्वीकारल्या जाण्याचं प्रमाण 73 टक्के होतं. पुढच्या आर्थिक वर्षात ते 53 टक्क्यांपर्यंत घसरलं, तर आता ते 50 टक्क्यांपर्यंत आलं आहे. Xpheno या स्पेशालिस्ट स्टाफिंग फर्मकडून मिळालेली ही आकडेवारी आहे. वर उल्लेख केलेल्या अन्य पात्रतेच्या उमेदवारांकडूनही ऑफर्स स्वीकारल्या जाण्याचं प्रमाण 80 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर आल्याचं समजतं. 'उमेदवारांची मागणी आणि पुरवठा यामध्ये सध्या असलेला फरक इतका मोठा आहे, की टॅलेंटेड उमेदवारांना निगोशिएशन्स (Negotiations) करायला पूर्ण वाव आहे. तसंच, महत्त्वाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षितांकडून ऑफर्स स्वीकारल्या जाण्याचं प्रमाण कमी आहे,' असंही इथॉनुर यांनी सांगितलं. डेटिंग App व्दारे संपर्कात आली अन्...; 5 स्टार हॉटेलमध्ये महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार करिअरनेट अँड लाँगहाउस कन्सल्टिंगचे सीईओ अंशुमन दास म्हणतात, 'उच्च पातळीच्या तांत्रिक कौशल्यांचा (High Level Tech Skills) विचार केल्यास दर 100 ऑफर्सपैकी 60 ऑफर्स स्वीकारल्या जातात; मात्र त्यापैकी केवळ 35 जणच नोकरीवर प्रत्यक्ष हजर होतात. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अशा उच्चशिक्षित इंजिनीअर्सकडे जी कौशल्यं असतात, त्यासाठी अन्य कौशल्याचे उमेदवार घेऊन काम होऊ शकत नाही. त्यामुळे ग्लोबल कॅप्टिव्ह्ज, आयटी सर्व्हिसेस, प्रॉडक्ट्स, ITeS, कन्सल्टिंग कंपनीज आदींमध्ये अशा उमेदवारांना खूप मागणी असते. Mercerच्या आशिया, मिडल इस्ट आणि आफ्रिका प्रदेशाच्या अध्यक्ष Renee McGowan यांनी सांगितलं, 'आताची भरती ही पदाच्या अनुषंगाने होण्यापेक्षा कौशल्याधारित होईल. त्यामुळे स्पेशलाइज्ड टेक्नॉलॉजी प्रोफेशनल्सना असलेली मोठी मागणी कायम राहील.' ISI नं रचला होता सिद्धू मुसेवाला हत्येचा कट?, शूटर महाकालनं केला मोठा खुलासा स्टार्टअप्सना होणारं फंडिंग (Startups Funding) कोरोनाच्या काळात थांबलं किंवा कमी झालं असलं, तरी अशा विशेष कौशल्याच्या उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजेसमध्ये कपात झाली नाही. Xphenoच्या माहितीनुसार, अशा इंजिनीअर्सना नव्या नोकरीत आधीच्या नोकरीच्या तुलनेत 100 टक्के पगारवाढही दिली गेल्याची कित्येक उदाहरणं आहेत. अशा क्षेत्रांत जॉबच्या संधी वाढल्याने नोकरी बदलताना पगारवाढ किती दिली जावी, याबद्दलच्या उमेदवारांच्या अपेक्षांमध्येही वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, चार ते सात वर्षांचा अनुभव असलेल्या फुल स्टॅक इंजिनीअर्स आता नोकरी बदलताना 70 ते 120 टक्के पगारवाढ अपेक्षित असते. गेल्या वर्षीच्या उमेदवारांना 25 ते 35 टक्के पगारवाढीची अपेक्षा असायची. अन्य स्पेशलाइज्ड इंजिनीअर्सच्या बाबतीतही असंच चित्र आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Job, Job alert

पुढील बातम्या