जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Government Job : महसूल विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, किती मिळेल पगार?

Government Job : महसूल विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, किती मिळेल पगार?

Government Job : महसूल विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, किती मिळेल पगार?

Department of Revenue Recruitment 2023 : डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू रिक्रूटमेंट 2023च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एका वर्षासाठी किंवा नियमित उमेदवार जॉइन होईपर्यंत 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 05 मे: रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण, स्मगलर्स अँड फॉरेन एक्स्चेंज मॅनिप्युलेटर्स अ‍ॅक्ट (SAFEMA), महसूल विभाग (DoR), वित्त मंत्रालयाने (MoF) कन्सल्टंट म्हणून काम करण्यासाठी सेवानिवृत्त केंद्र सरकारी अधिकार्‍यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवले आहेत. ही अधिसूचना 19.04.2023 रोजी काढण्यात आली आहे. डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू रिक्रूटमेंट 2023च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, एका वर्षासाठी किंवा नियमित उमेदवार जॉइन होईपर्यंत 5 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू रिक्रूटमेंट 2023च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, विहित पात्रता पूर्ण करणारे पात्र अर्जदार 31.05.2023 च्या तारखेपूर्वी अर्ज करू शकतात. पदांची नावं व रिक्त जागा: 1) सीनिअर पर्सनल सेक्रेटरी : 2 जागा 2) पर्सनल सेक्रेटरी : 3 जागा महसूल विभागाच्या अंतर्गत मिळणारे वेतन- 1: सीनिअर पर्सनल सेक्रेटरी : पे लेव्हल 8 किंवा समकक्ष 2 : पर्सनल सेक्रेटरी : पे लेव्हल 7 किंवा समकक्ष ट्रॅव्हल अलाउन्स- 3000 रुपये पेन्शन : कन्सल्टंट म्हणून नियुक्त केलेल्या सेवानिवृत्त सरकारी अधिकाऱ्यांना या काँट्रॅक्टच्या कालावधीतही पेन्शन व डिअरनेस रिलीफ मिळणार आहे. सीनिअर पर्सनल सेक्रेटरी किंवा पर्सनल सेक्रेटरी पदासाठी अर्ज करणाऱ्याचं वय 63 वर्षांपेक्षा जास्त नसावं. IT सेक्टरमध्ये जॉबची सर्वात मोठी संधी; Accenture कंपनीत भरतीची मोठी घोषणा; करा अप्लाय 1) सीनिअर पर्सनल सेक्रेटरी पोस्ट - सीनिअर प्रायव्हेट सेक्रेटरी, प्रायव्हेट सेक्रेटरी, पर्सनल असिस्टंट ऑफ सेक्रेटरिअ‍ॅट स्टेनोग्राफर्स सर्व्हिस किंवा इतर कोणत्याही तत्सम सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना स्टेनोग्राफर म्हणून संबंधित अनुभवासह 100 शब्द प्रति मिनिट आणि 50 मिनिटांत ट्रान्सक्रिप्शन येणं आवश्यक. कोर्ट, ट्रिब्युनल्स, अ‍ॅडज्युडिकेटिंग ऑथॉरिटीमध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. 2) पर्सनल सेक्रेटरी पोस्ट - सीनिअर प्रायव्हेट सेक्रेटरी, प्रायव्हेट सेक्रेटरी, पर्सनल असिस्टंट ऑफ सेक्रेटरिअ‍ॅट स्टेनोग्राफर्स सर्व्हिस किंवा इतर कोणत्याही तत्सम सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी. स्टेनोग्राफर म्हणून संबंधित अनुभवासह 100 शब्द प्रति मिनिट आणि 50 मिनिटांत ट्रान्सक्रिप्शन येणं गरजेचं. कोर्ट, ट्रिब्युनल्स, अ‍ॅडज्युडिकेटिंग ऑथॉरिटीमध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. निवडीचे निकष- कराराच्या आधारावर पूर्णवेळ कन्सल्टंट निवड कार्मिक आणि ट्रेनिंग गाइडलाइन्सनुसार केली जाईल. निवृत्तीच्या वेळच्या वेतनातून मूळ पेन्शन वजा करून एक निश्चित मासिक रक्कम दिली जाईल. कराराच्या मुदतीपर्यंत तीच रक्कम दिली जाईल. या काळात कोणतीच वाढ होणार नाही. या अधिकाऱ्यांची नियुक्ती एका वर्षासाठी केली जाईल. अर्ज कसा करायचा? रिटायरमेंट नोटिफिकेशन, पेन्शन पेमेंट ऑर्डरची कॉपी, तसंच शैक्षणिक पात्रता व अनुभव दर्शवणाऱ्या प्रमाणपत्राच्या स्कॅन कॉपी registrar-atfp@gov.in या मेल आयडीवर किंवा स्पीड पोस्टने रजिस्ट्रार अपील ट्रिब्युनल, ए विंग, चौथा मजला, लोकनायक भवन, खान मार्केट नवी दिल्ली, 110023 या पत्त्यावर 31 मे 2023 किंवा त्याआधी पाठवावी..

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात