जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / बाप्पा पावला, पुण्यातील प्रसिद्ध गणपती संस्थान देतेय रोजगाराची संधी, अशी आहे योजना

बाप्पा पावला, पुण्यातील प्रसिद्ध गणपती संस्थान देतेय रोजगाराची संधी, अशी आहे योजना

बाप्पा पावला, पुण्यातील प्रसिद्ध गणपती संस्थान देतेय रोजगाराची संधी, अशी आहे योजना

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराकडून 10 वी पास तरुणांना रोजगार मिळावा म्हणून विशेष कोर्स सुरू करण्यात येणार आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 12 मे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखला जातो. या ट्रस्टच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अनेक उपक्रम केले जातात. या ट्रस्टच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्यासाठी खास कोर्स सुरू करण्यात आला आहे. त्याचा फायदा पुणे तसंच परिसरातील तरुणांना होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने माफक दरात अल्प मुदतीचे रेफ्रीजरेशन, वॉशिंगमशिन, एअरकंडिशनिंग प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आलं आहे. या उपक्रमाचा फायदा तरुणांना होणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

काय आहे पात्रता? - रेफ्रिजरेटर, वॉशिंगमशीन, एअरकंडीशन प्रशिक्षण कोर्स जाण्यासाठीची पात्रता म्हणजे विद्यार्थी हा १० वी पास किंवा 12 वीची परीक्षा दिलेला असावा. तो बारावीमध्ये पास किंवा नापास असला तरीही चालेल. -या प्रशिक्षणाची वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे.त्याचप्रमाणे कोर्स कालावधी 90 दिवसांचा म्हणजेच 3 महिने एवढा आहे. या प्रशिक्षणाचे शुल्क 400 रुपये असून एका बॅचमध्ये 24 विद्यार्थी संख्या असेल. बारावीनंतर काय? ‘या’ विद्यापीठात 50 हुन अधिक कोर्सेस, प्रवेश घेण्याआधी हे वाचा कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी 1) आधार कार्डाची झेरॉक्स 2) 10 किंवा त्यापूढील कोणत्याही शिक्षणाचे मार्कशीट आवश्यक आहेत. कुठं घेणार प्रशिक्षण? गणपती सदन, पहिला मजला, 132 बुधवार पेठ, दगडूशेठ गणपती मंदिरामागे, पुणे - 411002 संपर्क क्र. - 24492000, 24498989 प्रशिक्षणासाठी इच्छूक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू असून. प्रथम येणाऱ्या पहिली प्राधान्य दिले जाणार आहे, अशी विशेष सूचना ट्रस्टनं दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात