जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / काय सांगता! लस घेतली नाही तर तुमची पगारवाढ येऊ शकते धोक्यात; प्रमोशनवरही होणार परिणाम

काय सांगता! लस घेतली नाही तर तुमची पगारवाढ येऊ शकते धोक्यात; प्रमोशनवरही होणार परिणाम

काय सांगता! लस घेतली नाही तर तुमची पगारवाढ येऊ शकते धोक्यात; प्रमोशनवरही होणार परिणाम

कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल तर याचे परिणाम आता कर्मचाऱ्यांना मोजावे लागण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जुलै: कोरोनाच्या (Corona virus) विरुद्ध लढा देण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे पूर्ण लसीकरण (vaccination) आहे असं सरकारकडून सतत सांगण्यात येतंय. सरकारी आणि काही खासगी अशा दोन्ही कंपन्यांमधील (Private companies) कर्मचाऱ्यांना कंपनीकडून लसीकरण उपलब्ध करून दिलं जात आहे. त्यात वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे सध्या तरी कर्मचारी सुरक्षित आहेत. मात्र ऑफिस सुरू झाल्यानंतर जर कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल तर याचे परिणाम आता कर्मचाऱ्यांना मोजावे लागण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतातील अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांचा सॅलरी डेटा त्यांच्या कोरोना स्टेटसशी (Covid-19 satus) लिंक करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच जर एखाद्या कर्मचाऱ्यानं लस घेतली नसेल तर याचा परिणाम त्याच्या पगारवाढीवर (Increment in salary) तसंच त्याच्या बढतीवर (Promotion in office) होऊ शकतो. यासाठी कंपन्या सतत आपल्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करत आहेत जेणेकरून संपूर्ण लसीकरण होऊन लवकरच ऑफिसेस सुरू करण्यात यावीत. मात्र कोर्टानं स्पष्ट केल्याप्रमाणे, लसीकरण हे ऐच्छिक असलं पाहिजे लस घेण्यासाठी कोणीही कोणाला जबरजस्ती करता कामा नये. मात्र ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलं नाही अशांच्या विरोधात कारवाई करण्याची जोखीम कंपनी उचलतील कारण हे लोकं बहुसंख्य कर्मचाऱ्यांना आपल्यामुळे धोक्यात टाकत आहेत असं Khaitan & Co. चे पार्टनर अंशुल प्रकाश यांनी म्हंटलं आहे. हे वाचा - परदेशात शिक्षणाला जायचंय पण पैसे नाहीत; चिंता करू नका; ‘अशी’ मिळेल आर्थिक मदत अंशुल यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर तुम्ही लस घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम तुम्हाला पगारवाढीमध्ये आणि प्रमोशनमध्ये भोगावे लागू शकतात असं कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगणं महत्त्वाचं आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी आधीच लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी लसीकरण न झालेले कर्मचारी धोका ठरू शकतात. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केलं नाही अशा लोकांकडे याचं काही स्पष्ट कारण नाही. लसीकरणानंतर त्रास होतो त्यामुळे एक दिवस सुटी घ्यावी लागते पैसे मिळत नाहीत अशी काही जणांची तक्रार असते. त्यांचा एक दिवसाचा पगार आम्ही देतो असं म्हणूनही काही लोकं लस घेत नाहीत. एका एम्प्लॉयमेंट लॉ पार्टनरच्या (Employment law partner) म्हणण्यानुसार, लस न घेतल्याचे परिणाम कर्मचाऱ्यांना आता नाही मात्र दीर्घ काळानंतर दिसू शकतात. कंपनीकडून त्यांची पागारवाढ रोखली जाऊ शकते, त्यांना बोनस देण्यास मनाई केली जाऊ शकते किंवा त्यांचं प्रमोशन अडवलं जाऊ शकतं. म्हणूनच कर्मचाऱ्यांनी आताच लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे. इतकंच नाही तर काही मोठ्या कंपनी अजून मोठी पावलं उचलू शकतात. ज्या कर्मचाऱ्यांनाही लस घेतली नाही अशा कर्मचाऱ्यांना प्रत्येक आठवड्याला RTPCR चाचणी करूनच ऑफिसला येण्याचे आदेश कंपनी देऊ शकतात. तसंच या चाचणीचे पैसेही कर्मचाऱ्यांनाच खर्च करावे अशी मागणी करू शकतात. त्यामुळे हे सर्व थांबवायचं असेल तर सर्व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण लसीकरण करणं महत्त्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात