मुंबई, 12 जानेवारी: वकिल (How to become lawyer) होण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे असा प्रश्न विचारला तर अनेकांना याचं उत्तर येणार नाही. याच प्रमुख कारण म्हणजे Law किंवा कायद्याचं शिक्षण इंजिनिअरिंगच्या तुलनेत खूप कमी विद्यार्थी घेतात. पण आजकालच्या काळात Law मध्ये शिक्षण (Education in Law) घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. Law मध्ये शिक्षण (Entrance Exam for education in Law) घेण्यासाठी महत्त्वाची असलेली परीक्षा म्हणजे CLAT (What is CLAT exam). या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन (How to register for CLAT Exam) करण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही या परीक्षेसाठी रजिस्टर केलं नसेल तर लवकरात लवकरात करा.
कायद्याच्या अभ्यासक्रमांसाठी, देशातील नामांकित संस्थेतून म्हणजेच नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून (National Law University) अभ्यास करण्यासाठी CLAT परीक्षा देणं अनिवार्य आहे. CLAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये CLAT स्कोर (How to calculate CLAT score) ठरवला जातो. तुम्हाला कायद्याचा कोर्स करायचा असेल, तर CLAT 2022 नोंदणी प्रक्रियेशी (Registration process for CLAT 2022) संबंधित महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊया.
फार्मसी क्षेत्रात आहेत करिअरच्या अनेक संधी; जाणून घ्या कसं घ्यावं शिक्षण
CLAT 2022 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे (CLAT 2022 last date). इच्छुक उमेदवार CLAT 2022 साठी 31 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना अधिकृत वेबसाइट consortiumofnlus.ac.in वर जाऊन प्रक्रिया (Website for CLAT 2022) पूर्ण करावी लागेल. यंदा CLAT 2022 ची परीक्षा 8 मे 2022 रोजी घेतली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी उमेदवारांनी अचूक रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे.
CLAT साठी ही पात्रता आवश्यक
कायदा अभ्यासक्रमाच्या पदवीपूर्व स्तरावर प्रवेश घेण्यासाठी, उमेदवारांनी 12 वी परीक्षा (Eligibility for CLAT 2022) उत्तीर्ण केलेली असावी. CLAT 2022 मध्ये ओपन कॅटेगिरीसाठी 45% आणि रिझर्व्ह कॅटेगिरीसाठी 40% गुण प्राप्त करणं अनिवार्य आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन लॉ कोर्ससाठी उमेदवारांनी LLB किंवा इतर कोणतीही परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ओपन कॅटेगिरीसाठी 50% आणि रिझर्व्ह कॅटेगिरीसाठी 45% गुण मिळणे बंधनकारक आहे. CLAT परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा नाही.
...म्हणून भारतात वाढतंय बेरोजगारीचं प्रमाण? कंपन्यांमध्ये चीनसारखं वर्क कल्चर
असं करा अप्लाय
CLAT 2022 परीक्षेला बसण्यास इच्छुक असलेले उमेदवार consortiumofnlus.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज (How to Apply for CLAT 2022) करू शकतात. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Education, Entrance exam, Law, जॉब