मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी  नोकरीची संधी; 27,500 रुपये मिळणार पगार

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी  नोकरीची संधी; 27,500 रुपये मिळणार पगार

मुलाखतीची तारीख 25, 26 आणि 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 25, 26 आणि 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 25, 26 आणि 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 14 नोव्हेंबर: मध्य रेल्वे मुंबई (Central Railway Mumbai Division) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पदव्युत्तर शिक्षक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, प्राथमिक शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 25, 26 आणि 27 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher)

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher)

प्राथमिक शिक्षक (Primary Teacher)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) -  संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) -  संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) -  संबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

इतका मिळणार पगार

पदव्युत्तर शिक्षक (Post Graduate Teacher) - 27,500/- रुपये प्रतिमहिना

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (Trained Graduate Teacher) - 26,250/- रुपये प्रतिमहिना

प्राथमिक शिक्षक (Primary Teacher) - 21,250/-  रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

प्राचार्यांच्या दालनात, सेंट्रल रेल्वे माध्यमिक (ENG) शाळा आणि ज्युनियर कॉलेज कल्याण

मुलाखतीची तारीख - 25, 26 आणि 27 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrccr.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Railway jobs, जॉब