मुंबई, 20 जुलै: परीक्षा संपून कित्येक दिवस उलटून गेलेत तरी अजूनही CBSE चा टर्म दोन चा निकाल (CBSE Term 2 Results Updates 2022) अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. गेल्या किहत्येक दिवसांपासून या निकालाची वाट बघत आहेत. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आता आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. यंदा दोन टर्ममध्ये परीक्षा झाल्यामुळे नक्की मूल्यांकन पद्धत कशी असणार याबद्दलही अजून स्पष्टता नाही. मात्र आता काही दिवसांमध्येच CBSE टर्म दोनचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शाळांमधील काही विद्यार्थ्यांचा दावा आहे की त्यांना त्यांचे निकाल तपासण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) पिन मिळाले आहेत. CBSE ने अद्याप निकालाच्या तारखांची पुष्टी केलेली नाही आणि जारी केलेला पिन खरा असल्यास, इयत्ता 10 आणि 12 वीच्या टर्म II चे निकाल आज रात्री लागतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. इकडे तिकडे नोकरी शोधणं आता सोडा; पुणे महापालिकेत 448 पदांसाठी होतेय बंपर भरती; ही घ्या लिंक बोर्डाच्या निकालांच्या घोषणेपूर्वी, CBSE ने विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित क्रियाकलापांचा मागोवा ठेवण्यास मदत करण्यासाठी ‘परीक्षा संगम’ नावाचे नवीन पोर्टल सुरू केले आहे. parikshasangam.cbse.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करून विद्यार्थी परिक्षा संगम पोर्टलवर प्रवेश करू शकतात. मार्कशीट्स cbse.nic.in, cbse.gov.in वर देखील उपलब्ध असतील. काय आहे परीक्षा संगम पोर्टल पोर्टल तीन विभागांमध्ये विभागले गेले आहे: शाळा (गंगा), प्रादेशिक कार्यालय (यमुना), आणि मुख्य कार्यालय (सरस्वती). विद्यार्थ्यांना परिपत्रके, अभ्यासक्रम, नमुना पेपर, परीक्षेची नोंदणी इत्यादीसह सर्व परीक्षा संदर्भ साहित्य माहिती शालेय विभागांतर्गत मिळेल. विद्यार्थी त्यांच्या विशिष्ट किंवा अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका पुनर्तपासणी आणि आवश्यक असल्यास पुनर्मूल्यांकनासाठी या विभागात पाठवू शकतात. दरम्यान, यूजर्सना प्रादेशिक कार्यालयाच्या विभागात कमांड, कंट्रोल आणि डेटा व्यवस्थापन, केंद्रीकृत LOC सुधारणा आणि बरेच काही यासाठी RO डॅशबोर्डबद्दल माहिती मिळेल. पोर्टलचा प्रत्येक विभाग युजर्सना अधिक तपशीलवार उप-विभागाकडे निर्देशित करणार आहे. परीक्षार्थींना नवीनतम माहितीसाठी अद्ययावत राहण्यासाठी cbse.gov.in, cbseresults.nic.in, तसेच परिक्षा संगम या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यावर्षी 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत झालेल्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या टर्म 2 च्या परीक्षेला 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. प्रथमच परीक्षा दोन टर्ममध्ये विभागली गेली होती. टर्म 1 चे निकाल आधीच आले आहेत, तथापि, टर्म 1 च्या परीक्षेच्या आधारे एकाही विद्यार्थ्याला उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण घोषित केले गेले नाही. आता टर्म 2 च्या निकालानंतर उत्तीर्णतेची टक्केवारी आणि इतर तपशील बाहेर येतील. आहात कुठे? नोकरी बघतेय तुमची वाट; राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात बंपर भरती CISCE आणि इतर बोर्डांनी टर्म 1 आणि टर्म 2 दोन्हीला समान महत्त्व दिले आहे. मात्र सीबीएसईचे विद्यार्थी नव्या फॉर्म्युल्यानुसार निकाल जाहीर करण्याची मागणी करत आहेत. ते म्हणतात की विद्यार्थ्याने ज्या एका टर्ममध्ये चांगली कामगिरी केली आहे त्या आधारे बोर्डाने निकाल जाहीर करावा. याशिवाय CBSE 10वी, 12वी बोर्डाच्या निकालांना उशीर होत असल्याबद्दल विद्यार्थी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहेत. ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.