जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / CBSE Board Exam Tips: गणिताच्या पेपरचे IMP प्रश्न आणि त्यांची उत्तरं हवी आहेत ना? मग हा Video बघाच

CBSE Board Exam Tips: गणिताच्या पेपरचे IMP प्रश्न आणि त्यांची उत्तरं हवी आहेत ना? मग हा Video बघाच

गणिताच्या पेपरचे IMP प्रश्न आणि त्यांची उत्तरं

गणिताच्या पेपरचे IMP प्रश्न आणि त्यांची उत्तरं

CBSE Exam 2023 चा गणिताचा पहिला पेपर हा एकूण 80 मार्कांचा असणार आहे. तसंच पेपरचं टायमिंग 3 तासांचं असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 फेब्रुवारी: बोर्डाच्या परीक्षा दिवसेंदिवस जवळ येऊ लागल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत मात्र मागील वर्षीपासून पुन्हा ऑफलाईन परीक्षा उरू झाल्या आहेत. तसंच यंदा संपूर्ण वर्ष शाळा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. पण कितीही अभ्यास झाला आहे असं म्हंटलं तरी एक विषय असतो ज्या विषयाचा अभ्यास कधीच झालेला नसतो. तो विषय म्हणजे ‘गणित’. गणिताचा अभ्यास म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा येतो. पण गणिताच्या पेपरचं संपूर्ण परीक्षा पॅटर्न आणि महत्त्वाचे प्रश्न माहिती असले की टेन्शन कमी होतं आज आम्ही तुम्हाला हीच माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. CBSE Exam 2023 चा गणिताचा एकच पेपर असणार आहे. यामध्ये अल्जेब्रा आणि जॉमेट्री दोन्ही असणार आहे. गणिताचा संपूर्ण पेपर हा एकूण 80 मार्कांचा असणार आहे. तसंच पेपरचं टायमिंग 3 तासांचं असणार आहे. त्यामुळे लक्ष देऊन पेपर सोडवण्याचा सल्ला एक्सपर्टकडून देण्यात आला आहे. असं असेल Paper Pattern हा पेपर एकूण 80 मार्कांचा असणार आहे. यामध्ये एकूण 38 प्रश्न जाणार आहेत. तसंच यामध्ये A ते E असे सेक्शन्स असणार आहेत. यामध्ये सेक्शन A हे 20 मार्कांचं असणार आहे . तर सेक्शन B हे 10 मार्कांचं असणार आहे. सेक्शन C हे 18 मार्कांचं असणार आहे तर सेक्शन D हे 20 मार्कांचं असणार आहे. तर शेवटचं सेक्शन सेक्शन E हे 12 मार्कांचं असणार आहे.

गणिताच्या पेपरला नक्की पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे आणि या पेपरमध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत याबाबत वरील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात