मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE बारावीचा निकाल जाहीर; ऑनलाईन, SMS आणि डिजिलॉकरच्या माध्यमातून असे पाहा मार्क

CBSE बारावीचा निकाल जाहीर; ऑनलाईन, SMS आणि डिजिलॉकरच्या माध्यमातून असे पाहा मार्क

 सीबीएसईने आपले बारावीचे निकाल (CBSE 12th Results 2022) अखेर जाहीर केले आहेत. हा रिझल्ट पाहण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा

सीबीएसईने आपले बारावीचे निकाल (CBSE 12th Results 2022) अखेर जाहीर केले आहेत. हा रिझल्ट पाहण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा

सीबीएसईने आपले बारावीचे निकाल (CBSE 12th Results 2022) अखेर जाहीर केले आहेत. हा रिझल्ट पाहण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा

    मुंबई, 22 जुलै :  सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, म्हणजेच सीबीएसईने आपले बारावीचे निकाल (CBSE 12th Results 2022) अखेर जाहीर केले आहेत. एकूण विद्यार्थ्यांपैकी 92.71 टक्के विद्यार्थी या परीक्षेत पास झाले आहेत. विद्यार्थ्यांचे निकाल हे सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट्सवर (CBSE official websites) उपलब्ध आहेत. Cbse.gov.in, cbse.nic.in, cbseresult.nic.in अशी ही संकेतस्थळं आहेत. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी त्यांचा रोल नंबर आणि शाळेच्या कोडची गरज भासणार आहे. मुलींमध्ये 94.54 टक्के विद्यार्थिनी पास झाल्या आहेत, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ही 91.25 टक्के आहे. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला आहे. जिल्हानिहाय निकालामध्ये तिरुवअनंतपुरमने (98.83 टक्के) बाजी मारली आहे. त्याखालोखाल बेंगळुरूचा (98.16 टक्के) क्रमांक लागला आहे. सीबीएसई बोर्डाच्या (CBSE board results) विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी 33 टक्के मार्कांची गरज असते. सीबीएसईने पहिल्या सत्रातील परीक्षेला 30 टक्के तर दुसऱ्या सत्रातील परीक्षेला 70 टक्के वेटेज दिले आहे. पहिल्या सत्रातील परीक्षेत विद्यार्थ्यांना व्यवस्थित अभ्यास करता आला नव्हता, त्यामुळे हे वेटेज कमी करण्यात आल्याचं सीबीएसईने स्पष्ट केलं. असा तपासा निकाल अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त आपला निकाल तपासण्यासाठी विद्यार्थी डिजिलॉकर अ‍ॅप (DIGILOCKER App), एसएमएस (SMS) किंवा उमंग अ‍ॅपचीही (UMANG App) मदत घेऊ शकतात. आपला निकाल पाहण्यासाठी पुढील काही पद्धती तुम्ही वापरू शकता – अधिकृत वेबसाईटवरून निकाल पाहण्यासाठी – 1. सीबीएसईची अधिकृत वेबसाईट उघडा. 2. सीबीएसई टर्म 2 रिझल्ट फॉर क्लास 12 या पर्यायावर क्लिक करा. 3. तुमचा रोल नंबर, स्कूल कोड आणि जन्मतारीख एंटर करा, आणि सबमिट बटणावर क्लिक करा. 4. स्क्रीनवर तुमची मार्कशीट दिसेल. 5. ही मार्कशीट डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा. एसएमएसमार्फत निकाल पाहण्यासाठी – 1. तुमच्या मोबाईलमधील एसएमएस अ‍ॅप (CBSE Result on SMS) उघडा. 2. ‘cbse12 (Space) roll number’ असा एसएमएस टाईप करा. या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे. 3. हा एसएमएस 7738299899 या नंबरवर पाठवा. तुमच्या फोनवर लगेच तुमची मार्कशीट पाठवली जाईल. डिजिलॉकरच्या मदतीने निकाल तपासण्यासाठी – 1. डिजिलॉकर (CBSE result on DIGILOCKER) ऑनलाईन पोर्टलला भेट द्या. 2. होमपेजच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या साईन अप ऑप्शनवर क्लिक करा. 3. तुमच्या आधार कार्डवर असलेलं तुमचं नाव, जन्मतारीख, कॅटेगरी, वैध मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, आधार नंबर या गोष्टी एंटर करून एक सहा आकडी सिक्युरीटी पिन जनरेट करा. 4. या डीटेल्स सबमिट केल्यानंतर एक युजरनेम निवडा. डिजिलॉकरवर तुमचं अकाउंट सुरू होईल. या माध्यमातून तुम्ही बारावी बोर्डाचा निकाल पाहू शकाल. 5. यानंतर एज्युकेशन या पर्यायाखाली असलेल्या सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन या पर्यायावर क्लिक करा. 6. क्लास 12 पासिंग सर्टिफिकेट/ रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. 7. तुमचा सीबीएसई बारावीचा रोल नंबर किंवा सीबीएसईकडे रजिस्टर असणारा तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. 8. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर सीबीएसई बारावीची मार्कशीट/सर्टिफिकेट/निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल मिळाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी त्यावरील वैयक्तिक माहिती नीट तपासणं गरजेचं आहे. तुमचं नाव, रोल नंबर, विषयांची नावं, शाळेचं नाव, मार्क, एकूण टक्केवारी इत्यादी गोष्टींची पडताळणी करणं आवश्यक आहे. यामध्ये काही चूक वा त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेमध्ये किंवा सीबीएसई बोर्डाला कळवणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपला निकाल अमान्य आहे, ते नंतर होणाऱ्या कंपार्टमेंट परीक्षेला बसू शकतात. गेल्या वर्षी बोर्डाचे एकूण 99.37 टक्के विद्यार्थी पास झाले होते. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. बारावीचा कला शाखेतील गेल्या वर्षीचा टॉपर हा हितेश्वर शर्मा होता. त्याला एकूण 99.8 टक्के मार्क मिळाले होते.
    First published:

    Tags: CBSE, CBSE 10th, CBSE 12th, Exam result

    पुढील बातम्या