मुंबई, 14 फेब्रुवारी: महाराष्ट्र स्टेट बोर्ड तसंच CBSE बोर्डाच्या परीक्षा येत्या काही दिवसात सुरु होणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांनी यासाठी प्रचंड अभ्यास सुरु केला आहे. सर्व विषयांचा अभ्यास पूर्ण झाला असला तरी काही विषय असे असतात ज्यांच्या अभ्यास कधीच पूर्ण होत नाही. ते विषय म्हणजे गणित आणि सायन्स. सायन्सच्या फिजिक्स आणि केमेस्ट्री मिळून एकच पेपर असणार आहे . म्हणूनच संपूर्ण सायन्सच्या पेपरचे काही महत्त्वाचे प्रश्न आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसंच या पेपरचं प्रश्नांचं पॅटर्न कसं असे हेही सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
यंदा संपूर्ण वर्ष शाळा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळाला आहे. यंदा सायन्सचा पहिला पेपर हा एकूण 80 मार्कांचा असणार आहे. तसंच पेपरचं टायमिंग 3 तासांचं असणार आहे.
असं असेल Paper Pattern
हा पेपर एकूण ऐंशी मार्कांचा असणार आहे. यामध्ये एकूण 39 प्रश्न जाणार आहेत. तसंच यामध्ये A ते E असे सेक्शन्स असणार आहेत. यामध्ये सेक्शन A हे वीस मार्कांचं असणार आहे . तर सेक्शन B हे बारा मार्कांचं असणार आहे. सेक्शन C हे एकवीस मार्कांचं असणार आहे तर सेक्शन D हे पंधरा मार्कांचं असणार आहे. तर शेवटचं सेक्शन सेक्शन E हे बारा मार्कांचं असणार आहे.
फिजिक्सचे IMP प्रश्न आणि उत्तरं Video बघण्यासाठी - इथे क्लिक करा.
केमेस्ट्रीचे IMP प्रश्न आणि उत्तरं Video बघण्यासाठी - इथे क्लिक करा.
सायन्सच्या पेपरला नक्की पेपरचं पॅटर्न कसं असणार आहे आणि या पेपरमध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत याबाबत वरील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Career, CBSE, CBSE 10th, Education