जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CBSE बोर्डाच्या वर्षांत 2 परीक्षा; अंतर्गत मूल्यांकनावर असेल भर

10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CBSE बोर्डाच्या वर्षांत 2 परीक्षा; अंतर्गत मूल्यांकनावर असेल भर

10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CBSE बोर्डाच्या वर्षांत 2 परीक्षा; अंतर्गत मूल्यांकनावर असेल भर

CBSE: पुढच्या वर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 2022 मध्ये विद्यार्थ्यांना दोन बोर्डाच्या परीक्षा द्याव्या लागतील.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 5 जुलै: कोरोनाव्हायरस साथीच्या (Coronavirus Pandemic)पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षं शिक्षण क्षेत्रात गोंधळाचं वातावरण आहे.  शाळा, कॉलेज बंद, परीक्षा लांबणीला आणि अखेर रद्द यामुळे पुढचे प्रवेश अडकलेले अशा गोंधळाच्या परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी (Board Exam) केंद्रीय शिक्षण बोर्डाने म्हणजे CBSE ने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांना दोन बोर्डाच्या परीक्षा (class X board exam) द्याव्या लागतील. सेमिस्टर पद्धतीप्रमाणे Term I आणि Term II अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या वेळेला परीक्षा घेण्यात येईल. या दोन्ही परीक्षांचे गुण अंतिम गुणपत्रिकेत धरले जातील. दोन्ही सत्र परीक्षा प्रत्येकी 90 मिनिटांच्या असतील. दोन्ही परीक्षांचे पेपर CBSE सेट करणार आहे. पहिली सत्र परीक्षा येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल तर दुसरी सत्र परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये होणार आहे. CBSE ने बोर्डाच्या परीक्षेचा पॅटर्नही बदलला आहे. पहिल्या सत्राच्या Term I परीक्षेसाठी MCQs म्हणजे पर्याय निवडा प्रकारची प्रश्नपत्रिका असेल . पण दुसऱ्या सत्रात काही प्रश्न कारणं द्या, सिद्ध करा (**assertion-reasoning type MCQs)**प्रकारचे बहुपर्यायी असू शकतील. परदेशात शिक्षणासाठी हे आहेत बेस्ट कोर्सेस; बघा कोणत्या देशात कुठला कोर्स चांगला पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्येही बाह्यकेंद्रावर परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसली तर दुसऱ्या सत्रात शाळा दोन तासाची परीक्षा घेतील, असं CBSE ने स्पष्ट केलं आहे. अंतर्गत मूल्यांकन ठरणार महत्त्वाचं फक्त Term I आणि Term II च्या बोर्डाच्या परीक्षाच नव्हे तर वर्षभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचं अंतर्गत मूल्यांकन अंतिम गुणपत्रिकेत महत्त्वाचं ठरणार आहे. पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांचा मुहूर्त ठरला; ही आहे तारीख या अंतर्गत मूल्यांकनालाच जास्त वेटेज देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यासाठी शाळा प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रोफाइल तयार करतील. विद्यार्थ्यांने वर्षभरात पूर्ण केलेला अभ्यास, प्रोजेक्ट, असाइनमेंट यावर विद्यार्थ्याचं अंतर्गत मूल्यमापन होईल आणि त्याची प्रतिमा अंतिम गुणपत्रिकेवर उमटेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून चालणार नाही, तर वर्षभर अभ्यास करावा लागणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात