मुंबई, 12 सप्टेंबर : दहावी-बारावीचे वर्ष (SSC and HSC) हे आयुष्याला दिशा देणारं असल्यानं त्याला मोठं महत्त्व आहे. दहावीच्या परीक्षेतील कामगिरीवर पुढील कॉलेज ठरतं. तर बारावीच्या निकालानंतर करिअरची दिशा स्पष्ट होते. जुलै महिन्यांमध्ये सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या बारावी परीक्षेचा निकाला लागला. या परीक्षेला देशभरातील विद्यार्थी बसतात. त्यामुळे याचे महत्त्व मोठे आहे. या परीक्षेत घाटकोपरच्या काश्वी कामतला (Kashvi Kamtah) 97.8 टक्के मार्क्स मिळाले होते. या घवघवीत यशानंतरही काश्वी समाधानी नव्हती. आपल्याला यापेक्षा देखील जास्त मार्क्स पडतील असता तिचा विश्वास होता. त्यामुळे तिने फेरतापसणीसाठी अर्ज केला. फेरतपासणीच्या निकालामध्ये तिचा आत्मविश्वास खरा ठरला. काश्वी आता थेट राज्यातील संयुक्त टॉपर (Joint topper in the state) बनली आहे. कशी ठरली टॉपर? घाटकोपरमध्ये राहाणाऱ्या काश्वी कामत बोरिवलीच्या एमकेव्हीव्ही इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थीनी होती. बारावीच्या परीक्षेत 97.8 टक्के मार्क्स तिला मिळाले होते. काश्वीला यापेक्षा अधिक मार्क्स आपल्याला मिळतील याची खात्री होती. याच आत्मविश्वासातून तिनं पेपर्स फेरतपासणीसाठी टाकण्याचा निर्णय घेतला. काश्वीचा हा विश्वास फेरतपासणीमध्ये खरा ठरला. तिचे बायलॉजी आणि केमिस्ट्री या विषयांमधील मार्क्स वाढले. त्यामुळे ती आता 99 टक्के मार्क्स मिळवून राज्यातील संयुक्त टॉपर ठरली आहे. नवी मुंबईच्या विद्यार्थ्यासोबत काश्वी आता राज्यात पहिली आहे. या घवघवीत यशानंतर काश्वी आनंदी आहे. ‘मला कॉम्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग या दोन्ही क्षेत्रांमध्ये रस आहे. बेंगळुरूच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ मध्ये संशोधक म्हणून संधी मिळाली आहे. यापैकी कोणते क्षेत्र निवडायचे याचा अंतिम निर्णय घेणे बाकी आहे,’ असे काश्वीने सांगितले. SBI Clerk 2022: पहिल्याच प्रयत्नात क्रॅक होईल परीक्षा; आतापासूनच असा Smartly सुरु करा अभ्यास ‘आपल्या जास्त मार्क्स मिळतील हा काश्वीला आत्मविश्वास होता. फेरतपासणीमध्ये ते सिद्धही झाले. पुढील वाटचालीमध्ये असा आत्मविश्वास असणे आवश्यक आहे,’ अशी भावना काश्वीच्या आई दीपा कामत यांनी व्यक्त केली. तर काश्वीनं कॉम्पुटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग यापैकी ज्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचे ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल. यापुढील आयुष्यातील सर्व टप्प्यांमध्ये आम्ही तिला मदत करू,’ असे काश्वीचे वडील कृष्णा कामत यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.